Thursday 19 March 2015

एमएमआरडीएतून स्वेच्छानिवृत्तीने मुक्तता, एमएमआरसीएलमध्ये वर्णी


मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएतून स्वेच्छानिवृत्ती घेणा-या अपात्र अधिकारी आर. रमन्ना  यांची सोय करत मुंबई मेट्रोची कंपनी एमएमआरसीएलमध्ये मध्ये वर्णी लावण्यात आली आहे. ज्या अधिका-याला सेवेतून मुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते त्यास गेली 10 वर्ष पोसण्याचे काम एमएमआरडीए प्रशासनाने केले आणि बिंग फूटताच स्वेच्छानिवृत्ती घेणा-या अपात्र अधिकारी आर. रमन्ना यांस पुनश्च मदत केली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाकडे माहिती विचारली होती की आर. रमन्ना आणि अन्य अधिकारी यांस सेवेतुन मुक्त करण्यासाठी शासनाने दिलेले आदेशावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र शासनाने दिनांक 11.10.2004 च्या आदेशानुसार 4 अधिका-यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु एमएमआरडीए प्रशासनाने रमन्ना यांना विशेष मदत करत सेवेतुन मुक्त न करता त्यांची नव्याने नेमणूक सरळ सेवेने खुल्या प्रवर्गातील परिवहन नियोजक या पदावर केली.आधी मागासवर्गीयासाठी(अनुसूचित जाती) याचा लाभ घेणा-या रमन्ना त्यानंतर सरळ सेवेत समाविष्ट करून घेतले. रमन्ना सारखे अजुन जे अधिकारी होते त्यापैकी प्रवीण कुमार, मिंझ यांनी कार्यवाहीच्या भीतिपोटी पदाचा राजीनामा दिला. पी.के.नाईक सीमा भागातील असल्यामुळे  त्यांस वगळण्यात आले.एमएमआरडीए प्रशासनाच्या अनियमित नियुक्त्या पदोन्नत्या बाबतची पडताळणी सेवानिवृत अवर सचिव श्री कोचरेकर यांनी केली असता निवड समित्या व विभागीय पदोन्नती समित्यांमधील 2 अधिकारी वर्गाना जबाबदार ठरविले आणि त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत ठपका ठेवण्याची शिक्षाही केली गेली.परंतु ज्या अधिकारी मुळे कार्यवाही केली त्यास नवीन नियुक्ती देत चुकीच्या कामाना प्रोत्साहन दिले. शासनाने आदेश दिला असताना ही सद्याचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी त्यावेळी दिनांक 29.04.2002 रोजी प्रकल्प संचालक या नात्याने रमन्ना यास मदत केली होती. दस्तुरखुद्द मदान यांनी ही त्यावेळी मान्य केले होते की या अधिकारीवर्गाना शासनाच्या निर्णयाप्रमाणे नेमणुकीचे/ पदोन्नतीचे फायदे देय नव्हते. परंतु ते फायदे त्यांना नकळत देण्यात आलेले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2014 रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे तक्रार करताच रमन्ना यांनी एमएमआरडीएतील प्राधिकरणातील अतिरिक्त प्रमुख परिवहन नियोजन या पदाचा राजीनामा देऊन स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्याबाबत दिनांक 22 डिसेंबर 2014 रोजी विनंती अर्ज सादर केला असता तो स्विकारत त्यांस दिनांक 21 जानेवारी 2015 पासून सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने गलगली यांस दिनांक 13 मार्च 2015 रोजी पत्राने कळविली. प्रत्यक्षात दिनांक 15 डिसेंबर 2014 रोजी त्यांस मुंबई मेट्रो रेल कारपोरेशन लिमिटेड यात समावून घेत कार्यकारी संचालक या पदावर नियुक्त करण्यात आले. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री यांस पत्र पाठवून या नियुक्तिची चौकशी करण्याची मागणी केली आहे.





No comments:

Post a Comment