Monday 28 March 2022

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटीचे वार्षिक स्नेह संमेलन

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परिचारिका समुदायाचे सार्वजनिक आभार मानत प्रतिपादन केले की कोरोना काळात डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बजावली आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अश्या परिचारिका यांना सर्व स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटी २०२२ च्या कार्यकारिणीने केईएम परिचारिका इमारत परिसरात वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना निमंत्रित करण्यात आले होते. परिचारिकेच्या कार्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत भविष्यात त्यांना येणा-या अडचणी या प्रशासनापर्यंत पोहचवून सकारात्मक निराकरण करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. रूग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी केईएमच्या परिचारिकेच्या सहकार्याने गरीब गरजू रुग्णांना मदत होत असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

वार्षिक स्नेहसंमेलनास मेट्रन प्रतिमा नाईक, सिस्टर इंचार्ज मेघना गांगुर्डे, असिस्टंट मेट्रन लता कांबळे, सिस्टर इन्चार्ज रिध्दी राणे, वाॅर्ड असिस्टंट रविंद्र वरखडे, सिस्टर ट्यूटर ज्योत्सना जाधव, सिस्टर इन्चार्ज श्वेता परब, निलीमा शिंदे, स्टाफ नर्स श्रुती गमरे, सायली माने, स्नेहा पाटील, प्रज्ञा देसक व सहकारी परिचारिका यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण उत्तमरित्या केले. मेट्रन प्रतिमा नाईक यांनी अनिल गलगली व विनोद साडविलकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व परिचारिकांनी नृत्य, गाणी अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केले.

#अनिलगलगली #मुंबई2022 #KEMHospital #केईएमरुग्णालय #परिचारिका #नर्स #वार्षिकस्नेहसंमेलन

https://www.facebook.com/764999096874209/posts/7395554467151939/


Tuesday 22 March 2022

125 मंडलों ने मिलकर कुर्ला में मनाई शिव जयंती

कुर्लेकर ने ' एक हुए कुर्लेकर एक शिवजयंती सर्वत्र' घोषित कर वर्ष 2019 से उसी दिन यानी फाल्गुन वद्य तृतीया को शिव जयंती मनाने का फैसला किया। कुर्ला में 125 सार्वजनिक मंडल, संगठन, राजनीतिक दल एक साथ आए और एक साथ जुलूस निकाला गया। वर्ष 2019, वर्ष 2020 में भव्य तरीके से शोभायात्रा निकाली गई। लेकिन वर्ष 2021 में कोरोना संकट के कारण कोई भव्य जुलूस नहीं निकला। लेकिन इस साल कुर्लेकर ने एक साथ आकर शिव जयंती को भव्य जुलूस के साथ मनाया। इस साल का उत्साह कुछ अलग था। ढोल, पारंपरिक हल्गी वाद्ययंत्र, श्रीकृष्ण क्रीड़ा मंडल की लड़कियों की लेज़िम मंडली, शिव-युग के हथियारों का प्रदर्शन, छत्रपति शिवाजी महाराज और मावला बने कलाकारों ने सभी का ध्यान खींचा। इस जुलूस में शिवराय की पालकी का कुर्ला के हर स्थान पर स्वागत किया गया। इस जुलूस में कुल 5000 नागरिक मौजूद थे।

इस जुलूस में पारंपरिक वेशभूषा में महिलाओं ने श्री सर्वेश्वर मंदिर में शिवराय का झूला का प्रदर्शन किया। पुलिस उपायुक्त प्रणव अशोक ने छत्रपति शिवाजी महाराज का माल्यार्पण कर स्वागत किया। इस मौके पर विधायक मंगेश कुडालकर, सूचना अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली, पूर्व नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती के उमेश गायकवाड, गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, अजय बालू यादव, किरण सुर्वे, किशोर सोनावणे, अजय शुक्ला, किरण दामले के साथ सभी राजनीतिक दल, मंडल के पदाधिकारी की उपस्थिती थी। इस भव्य दिव्य जुलूस में कुर्लेकरों में उत्साह का माहौल बन गया था।

125 मंडळांनी एकत्र येऊन कुर्ल्यात साजरी झाली तिथीनुसार शिवजयंती

'झाले कुर्लेकर एकत्र एकच शिवजयंती सर्वत्र' अशी घोषणा करून कुर्लेकरांनी सन 2019 सालापासून शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी करण्याचे ठरवले. कुर्ल्यातील 125 सार्वजनिक मंडळे , संस्था, राजकीय पक्ष एकत्र आले आणि एकत्रित मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. सन 2019, सन 2020 अशा दोन वर्षी भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु सन 2021 साली कोरोनाच्या संकटामुळे भव्य मिरवणूक होऊ शकली नाही. परंतु यंदाच्या वर्षी कुर्लेकरांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. यंदाचा जल्लोष काही वेगळाच होता. ढोल ताशे, पारंपरिक हलगी वादन, श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या मुलींचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिके, छत्रपती शिवराय व मावळयांच्या वेशात कलाकार यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. या मिरवणुकीतील शिवरायांच्या पालखीचे प्रत्येक मंडळ स्थानी जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत एकूण 5000 नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

या मिरवणुकीत श्री सर्वेश्वर मंदिरात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवरायांचा पाळणा सादर केला. पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांनी छत्रपती शिवरायांना हार घालून स्वागत केले., याप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे उमेश गायकवाड, गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, अजय बाळू यादव, किरण सुर्वे, किशोर सोनावणे, अजय शुक्ला, किरण दामले तसेच सर्व राजकीय पक्षांचे आणि मंडळांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या भव्यदिव्य मिरवणुकीने कुर्लेकरांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shiva Jayanti was celebrated in Kurla by 125 Mandal's

Kurlekar decided to celebrate Shiva Jayanti on the same day i.e. Falgun Vadya Tritiya from the year 2019 by announcing that 'Kurlekar together, one Shiva Jayanti is everywhere'. 125 local Mandal's, NGO, political parties in Kurla came together and started marching together. In the year 2019, the year 2020, the procession was taken out in a grand manner. But the Corona crisis in 2021 did not lead to a grand procession. But this year, Kurlekar came together and celebrated Shiva Jayanti with a grand procession. This year's Celebration was something different. Drums, traditional halgi instruments, lezim troupe of Shrikrishna Krida Mandal girls, Shiva-era weapons demonstrations, performers in the guise of Chhatrapati Shivaji and Mavala captured everyone's attention. In this procession, every spot procession welcome By local Resident. A total of 5000 Resident were present in the procession.

In this procession, women in traditional attire performed Shivaraya in the Sarveshwar temple. Deputy Commissioner of Police Pranab Ashok welcomed Chhatrapati Shivaji Maharaj with a garland. On this occasion MLA Mangesh Kudalkar, RTI activist Anil Galgali, former corporator Dr. Anuradha Pednekar, Manoj Nathani, Umesh Gaikwad of Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav Sohla Samiti, Ganesh Chikne, Dilip Sarate, Bhanudas Gade, Ajay Balu Yadav, Kiran Surve, Kishore Sonawane, Ajay Shukla , Kiran Damle as well as office bearers of all political parties and circles were present. This magnificent procession has created an atmosphere of excitement and elation in Kurlekar.

Monday 21 March 2022

समाज को दिशा देनेवाले ग्रंथालय कर्मियों की मांग पर सरकार उदासीन- अनिल गलगली

मुंबई के आझाद मैदान में महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ की ओर से विभिन्न मांग को लेकर किया गया आंदोलन को समर्थन देते हुए आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने कहा कि समाज को दिशा देनेवाले ग्रंथालय कर्मियों की मांग पर सरकार उदासीन हैं.

आजाद मैदान में महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ की ओर से विभिन्न मांग को लेकर आंदोलन चल रहा हैं. आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने कहा कि वर्ष 2012 से नई मान्यता नहीं दी गई हैं और कार्यरत ग्रंथालय की अवस्था दयनीय हैं. राज्य के उच्च व तंत्र शिक्षा विभाग आखिर क्या करता हैं ? ऐसा सवाल करते हुए गलगली ने कहा कि खास ऐसे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय को 5 करोड़ का अनुदान दिया जाता हैं और ग्रामीण क्षेत्र के ग्रंथालय की ओर सरकार का ध्यान नहीं हैं. ग्रंथालय सेवकों की अनंत समस्याएं हैं. उस ओर ताबड़तोड़ ध्यान देने की आवश्यकता हैं. गलगली ने आगे कहा कि शिक्षा क्षेत्र में ग्रंथालय हैं लेकिन ग्रंथपाल ही नहीं हैं, ऐसी भयानक परिस्थिती हैं. पढ़ने की संस्कृती का दावा करनेवाली सरकार ईमानदारी से काम करनेवाले कर्मचारियों को किंमत नहीं दे रही हैं,यह खेदजनक हैं. इस मौके पर डॉ गजानन कोटेवार, डॉ दत्ता परदेशी, एड प्रवीण पाटील, सुनील कुबल, डॉ कृष्णा नाईक, अनिल सोनावणे, डॉ राजशेखर वालेकर, प्रमोद खानोलकर आदी उपस्थित थे.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ के आंदोलन को अनिल गलगली का खुला समर्थन

समाजाला दिशा देणा-या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन- अनिल गलगली

मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवित आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की समाजाला दिशा देणा-या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन आहे. 

आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की वर्ष 2012 पासून नवीन मान्यता दिली नसून अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खाते नेमके काय करत आहे? असा सवाल करत गलगली म्हणाले की विशिष्ट असे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला 5 कोटींचे अनुदान दिले जाते आणि ग्रामीण भागातील ग्रंथालयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रंथालय सेवकांचे अनंत प्रश्न आहे त्याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. गलगली पुढे म्हणाले की शिक्षण क्षेत्रात ग्रंथालय आहेत पण ग्रंथपालच नाही अशी दारुण परिस्थिती आहे.  वाचन संस्कृतीच्या बाता करणारे शासन ते काम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वा-यांवर सोडत आहे, ही चिंताजनक बाब आहे. यावेळी डॉ गजानन कोटेवार, डॉ दत्ता परदेशी, एड प्रवीण पाटील, सुनील कुबल, डॉ कृष्णा नाईक, अनिल सोनावणे, डॉ राजशेखर वालेकर, प्रमोद खानोलकर आदी उपस्थित होते.

Thursday 17 March 2022

267 करोड़ के 19 में से 17 ऑक्सिजन प्लांट समय पर बिठाने में मनपा अधिकारी और ठेकेदार फेल

कोरोना समय में विवादित ऑक्सिजन प्लांट के टेंडर में हुई अनियमितता और अधिक मूल्य देने का आरोप लगाया गया था। बड़ा दावा कर मुंबई में बिठाया गया 267 करोड़ के मूल्य के 19 में से 17 ऑक्सिजन प्लांट का काम समय अवधि तक पूर्ण करने में ठेकेदार और उनके सरंक्षक अधिकारी फेल होने की जानकारी आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली को उपलब्ध हुए जवाब से सामने आई हैं वही दूसरीओर कुछ कार्रवाई करने के नाम पर ठेकेदारों को सिर्फ 4.07 करोड़ का नाममात्र जुर्माना लगाकर अभय देने का काम हुआ हैं। 


आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने मुंबई मनपा से मुंबई में बिठाए गए ऑक्सिजन प्लांट की जानकारी मांगी थी। मनपा के यांत्रिकी व विद्युत विभाग के कार्यकारी अभियंता शाम भारती ने अनिल गलगली को 19 प्लांट की जानकारी दी हैं इसमें से 17 ऑक्सिजन प्लांट का निर्माण काम समय पर पूर्ण नहीं किया गया। इस 19 में से 12 काम मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी को वहीं 7 काम यह मेसर्स जीएसएन असोसिएट को दिया गया हैं। 

मुंबई महानगरपालिका ने पहिले चरण में मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी को 9 स्थानों पर  22,790 एलपीएम प्लांट का निर्माण करने के लिए 25 जून 2021 को कार्यादेश जारी किया गया जिसकी किंमत 77.15 करोड़ इतनी हैं। सभी काम की अवधि  30 दिन की थी। वीएन देसाई, बीडीबीए, कस्तुरबा, नायर, कूपर और केईएम में प्लांट 19 अगस्त 2021 को पूर्ण किया गया और 20 अगस्त 2021 को कुर्ला भाभा, 25 अगस्त 2021 को सायन वहीं 26 अगस्त 2021 को जीटीबी में काम पूर्ण किया गया। इसमें 3.06 करोड़ का जुर्माना लगाया गया। इस कारवाई को ठेकेदार ने चुनौती दी हैं। 

पहिले चरण में पूरी तरह फेल होने के बाद असफल साबित हुए मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी को ब्लैक लिस्ट करने के बजाय मनपा ने मेहरबान होकर दूसरे चरण में और 59.36 करोड़ का नया काम का कार्यादेश 27 सप्टेंबर 2021 को जारी किया गया। इसमें 19,760 एलपीएम प्लांट निर्माण का काम था। दहिसर और ऑक्टय नाके का काम समय पर पूरा किया गया लेकिन केजे सोमय्या स्थित काम 12 दिन की देरी से पूरा किया गया। 

तीसरा चरण इसलिए महत्वपूर्ण हैं क्योंकि प्रोजेक्ट की किंमत यह 130.86 करोड़ इतनी हैं जिसमें 43,500 एलपीएम प्लांट का निर्माण करने का काम यह मेसर्स जीएसएन असोसिएटस को दिया गया। कार्यादेश 27 सितंबर 2021 को जारी किया गया लेकिन एक भी काम निश्चित अवधि में पूरा नहीं किया गया। 12 से 86 दिन की देरी से हुई लेकिन इसमें ठेकेदार को मनपा अधिकारियों ने बचाने का काम करते हुए सिर्फ 1.04 करोड़ का जुर्माना लगाया गया। इसमें बीकेसी फेज 1, बीकेसी फेज 2, नेस्को, दहिसर चेकनाका, भायखला और मुलुंड का रिचर्डसन अँड कृडस वहीं कांजूरमार्ग को लेकर 7 स्थान हैं।

पहिले चरण में 30 दिन यह काम को पूरा करने की समय अवधि थी जिसे दुसरे और तीसरे चरण में बढ़ाकर 45 दिन किया गया। इस खेल में ठेकेदार को मदद करने के बावजूद 8 काम यह अवधि बढ़ाकर देने के बाद भी समय पर पूरे नहीं हो पाए। काम जो समय में पूरे नहीं हो पाए उसके लिए जो खुलासा किया गया वह समझ से परे हैं। इसमें बड़ी बारिश और बिजली आपूर्ति को आगे किया गया है। एक स्थान पर प्लांट निर्माण के लिए मौजूदा घरों का निष्कासन न होने का कारण दिया गया हैं।

अनिल गलगली का कहना हैं कि ऑक्सिजन प्लांट टेंडर तैयार करते वक्त बाजारमूल्य से अधिक किंमत उल्लेखित करने से मनपा को 100 करोड़ से अधिक का घाटा हुआ हैं। अनुभव न होते हुए भी जिन ठेकेदारों को काम दिया गया उनपर मामूली जुर्माना लगाकर मनपा अधिकारी अपनी गलतियों को छिपाने का काम कर रहे हैं। इसलिए बाद में ठेकेदार को मदद करने के लिए पहले जो समय अवधि 30 दिन की थी उसे बढ़ाकर 45 दिन किया गया इसके बाद भी काम समय पर पूरा नहीं हो पाया। इस काम में जूनियर से लेकर सीनियर अधिकारियों ने किस उद्देश्य से नजरअंदाजी की इसकी जांच होनी चाहिए। जुर्माना सिर्फ ठेकेदार को लगाया गया हैं जबकी सभी अधिकारियों की जिम्मेदारी निश्चित कर कारवाई करने की मांग अनिल गलगली ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और मनपा आयुक्त को भेजे हुए पत्र में की हैं।

267 कोटींचे 19 पैकी 17 ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण करण्यात पालिका अधिकारी व कंत्राटदार अपयशी

कोरोना काळात वादग्रस्त ठरलेल्या ऑक्सिजन प्लांट निविदेत अनियमितता आणि अधिक मूल्य देण्याचा आरोप करण्यात आला होता. मोठमोठे दावे करत मुंबईत उभारलेल्या 267 कोटींचे 19 पैकी 17 ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण करण्यात कंत्राटदार आणि त्यांचे पाठीराखे अधिकारी वर्गास अपयश आल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीतून समोर आली आहे तर काहीतरी कारवाई करण्याच्या हेतुने कंत्राटदारांवर फक्त 4.07 कोटींचा शुल्लक दंड आकारत अभय देण्यात आले आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मुंबईत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची माहिती विचारली होती. पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत खात्याचे कार्यकारी अभियंता शाम भारती यांनी अनिल गलगली यांस 19 प्लांटची माहिती दिली आहे त्यापैकी एकाही ऑक्सिजन प्लांटचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. या 19 पैकी 12 कामे मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीस तर 7 कामे ही मेसर्स जीएसएन असोसिएटसला देण्यात आली आहेत. 

पहिल्या टप्प्यात 77.15 कोटींचे काम

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीस 9 ठिकाणी 22,790 एलपीएम प्लांट उभारणी करण्यासाठी 25 जून 2021 रोजी कार्यादेश जारी केले ज्याची एकूण किंमत 77.15 कोटी इतकी होती. सर्व कामांची मुदत 30 दिवस होती. व्हीएन देसाई, बीडीबीए, कस्तुरबा, नायर, कूपर आणि केईएम येथील प्लांट 19 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण करण्यात आले आणि 20 ऑगस्ट रोजी कुर्ला भाभा, 25 ऑगस्ट रोजी सायन तर 26 ऑगस्ट रोजी जीटीबी येथील काम पूर्ण करण्यात आले. यात 3.06 कोटींचा दंड आकारण्यात आला असून या कारवाईला कंत्राटदाराने आव्हान दिले आहे.

दुसऱ्या टप्पा 59.36 कोटींचा 

पहिल्या टप्प्यात अपयशी ठरलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीस काळया यादीत टाकण्याऐवजी पालिकेने उदार होत दुसऱ्या टप्प्यात 59.36 कोटींचे नवीन कामाचे कार्यादेश 27 सप्टेंबर 2021 रोजी जारी केले. यात 19,760 एलपीएम प्लांट उभारणी करण्याचे काम होते. दहिसर आणि ऑकंट्रोई नाक्यावरील काम वेळेत पूर्ण झाले पण केजे सोमय्या येथील काम 12 दिवसांच्या विलंबाने पूर्ण करण्यात आले. 

तिसरा टप्पा 130.86 कोटींचा 

तिसरा टप्पा यासाठी महत्वाचा आहे कारण प्रकल्पाची किंमत ही 130.86 कोटी इतकी असून यात 43,500 एलपीएम प्लांट उभारणी करण्याचे काम हे मेसर्स जीएसएन असोसिएटसला देण्यात आली. कार्यादेश 27 सप्टेंबर 2021 रोजी काढण्यात आले पण एकही काम मुदतीत पूर्ण करण्यात आले नाही. 12 ते 86 दिवसांचा विलंब झाला पण यात कंत्राटदारांस पालिका अधिकारी वर्गानी वाचवले आणि फक्त 1.04 कोटींचा दंड आकारला. यात बीकेसी फेज 1, बीकेसी फेज 2, नेस्को, दहिसर चेकनाका, भायखळा आणि मुलुंड येथील रिचर्डसन अँड कृडस तसेच कांजूरमार्ग येथील 7 ठिकाणे आहेत.

कामाची मुदत कशी वाढविली?

पहिल्या टप्प्यात 30 दिवसांची मुदत ही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वाढवित 45 दिवस करण्यात आली. यात कंत्राटदारांना झुकते माप देण्यात आले तरीही 8 कामे ही अधिक दिवस वाढवूनही पूर्ण करण्यात आली नाही. काम मुदतीत न करण्यामागे जी कारणे दिली आहेत ती न पटण्याजोगी असून यात मोठा पाऊस आणि नसलेला वीज पुरवठा ही समाविष्ट करण्यात आली आहेत तर एका ठिकाणी प्लांट बांधण्यासाठी अस्तित्वात असलेल्या खोल्यांचे निष्कासन न होण्याचे कारण दिले आहे.

अनिल गलगली यांच्या मते ऑक्सिजन प्लांट निविदा तयार करताना बाजारमूल्य पेक्षा अवाढव्य किंमत नमूद करण्यात आली त्यामुळे पालिकेस 100 कोटींचे नुकसान झाले आहे. अनुभव नसतांनाही ज्या कंत्राटदारांस काम दिले त्यास दंड आकारत पालिका अधिकारी आपल्या चुकांवर पांघरूण घालत आहे. कंत्राटदारांस मदत करण्यासाठी आधी 30 दिवसांची असलेल्या मुदतीत 45 दिवस करण्यात आले त्यानंतरही कामे वेळेत पूर्ण करण्यात आली नाही. यात कामांत कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी यांनी कोणत्या प्रयोजनाने दुर्लक्ष केले याची चौकशी करणे आवश्यक आहे तसेच दंड फक्त कंत्राटदार यांस आकारला गेला असून सर्व अधिकार वर्गाची जबाबदारी निश्चित करत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात गलगली यांनी केली आहे.