Tuesday 10 March 2015

फडणवीसाच्या दिमतीला मागील मुख्यमंत्री आणि मंत्री कार्यालयातील 78 टक्के स्टाफ

केंद्रातील मोदी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही मागील सरकारच्या मंत्री आस्थापनेवरील अधिकारीवर्गाची वर्णी न लावण्याचा शासन आदेश जारी झाला असला तरी आजच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिमतीला मागील मुख्यमंत्री कार्यालयातील 78 टक्के स्टाफ कार्यरत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयास मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आणि मागील सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वृदांची माहिती मागितली असता ती न देता अर्ज सामान्य प्रशासनाकडे हस्तांतरित केला. सामान्य प्रशासनातील अवर सचिव दि.वा.नाईक यांनी अनिल गलगली यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वृदांची यादी दिली.सदर यादीत मागील आणि सद्याच्या सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वृंद जवळपास समान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिमतीला मागील मुख्यमंत्री कार्यालय आणि अन्य मंत्री आस्थापनेतील 82 टक्के स्टाफ कार्यरत होता. वाहनचालकांपासून ते उप सचिवांपर्यंत अश्या एकुण 102 पैकी 83 अधिकारी आणि कर्मचारी वृंद ही मुख्यमंत्री,मंत्री आणि राज्यमंत्री आस्थापनेवरील आहेत.यामध्ये 78 मुख्यमंत्री आणि 5 मंत्री आणि राज्यमंत्री आस्थापनेवरील आहेत. नुकतेच यापैकी 4 अधिकारी यांची सेवा मूळ विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आल्यामुळे आता ही संख्या 79 आहे.

मुख्यमंत्री आस्थापनेवर 4 उप सचिवांपैकी 2 उपसचिव हे चन्द्रकांत हंडोरे आणि रणजीत कांबले यांसकडे होते. 5 अवर सचिवांपैकी 3 उपसचिव हे यापूर्वी मुख्यमंत्री आणि फौजिया खान यांसकडे होते. फौजिया खान कडील डॉ किरण पाटील यांची सेवा मूळ विभागात म्हणजेच वित्त विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली. कक्ष अधिकारी यांची संख्या 9 असुन फक्त एकच कक्ष अधिकारी नवीन आहे. 6 माजी मुख्यमंत्री तर 2 कक्ष अधिकारी यांनी राजेश टोपे आणि जयदत्त क्षीरसागर यांसकडे काम केले आहे. भगवान सावंत आणि अजय वाघ यांची सेवा मूळ विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली. सहायक असलेले रा.सु.सोनावणे यांची सेवा मूळ विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली.13 पैकी 8 लघुलेखक, 28 पैकी 24 लिपिक टंकलेखक, 23 पैकी 21 शिपाई मागील सरकारात मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते.1 विशेष कार्य अधिकारी, 3 लघु टंकलेखक, 1 सहकारी अधिकारी, 1 वरिष्ठ स्वीय सहायक, 1 वरिष्ठ लिपिक, 5 सहायक, 1 लेखा अधिकारी, 1 सहायक लेखा अधिकारी, 1 देयक लेखापाल, 1 नाईक हे  सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयात असल्याची बाब स्पष्ट होत आहे.

दिनांक 1 डिसेंबर 2014 रोजी फडणवीस सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात मागील 10 वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री,राज्यमंत्री यांच्या कार्यालयात खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी व स्वीय सहायक म्हणून कार्य केले असेल त्यांना पुढील 5 वर्षे मंत्री आस्थापनेवर काम करता येणार नसल्याचे नमूद केले होते परंतु यामध्ये चालाखी दाखवित फडणवीस सरकारने अन्य अधिकारी आणि कर्मचारी वृंदाना वगळले होते, असे सांगत अनिल गलगली यांनी फडणवीस सरकारने याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासल्याचे नमूद केले. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून त्यांच्याच शासन निर्णयाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
   

  #  फडणवीसांचे 11 रत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्या 11 बाहेरील लोकांना अमर्याद अधिकार दिले आहेत ज्यामुळे त्यांना हे फडणवीसांचे 11 रत्न असल्याची चर्चा मंत्र्यालयातील सर्वच विभागात होत आहे. 5 विशेष कार्य अधिकारी, 3 सहायक लिपिक आणि प्रत्येकी 1-1 असे 3 पदांवर स्वीय सहायक, सोशल मीडिया एडवाईजर आणि वाहनचालक आहेत. यापैकी 1 भाजपा कार्यकर्ती असून प्रथमच कोण्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षांच्या राजकीय चेल्याची वर्णी लावल्याची पहिलीच घटना आहे.

No comments:

Post a Comment