Saturday, 14 March 2015

महाराष्ट्र पोलीस दलात 12115 पोलिसांची पदे रिक्त

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस अपर पोलीस महासंचालकापासून ते शिपाई पर्यंत 12115 पोलीस पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पोलीस महासंचालक मुख्यालयाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे 2708 पोलीस उपनिरीक्षक यांची आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पोलीस महासंचालक मुख्यालयाकडे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वृंदाची माहिती मागितली होती. पोलीस महानिरीक्षकांचे वरिष्ठ उप सहायक तथा शासकीय माहिती अधिकारी पं.कि.घुगे यांनी दिनांक 1 मार्च 2015 अखेर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक ते पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची माहिती देत कळविले एकुण मंजूर पदे 2,19,986 आहेत त्यापैकी 2,07,871 कार्यरत आहेत. एकुण रिक्त पदे 12,115 आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सर्वाधिक अधिक पदे ही पोलीस उपनिरीक्षक यांची रिक्त आहेत.या घडीला 9651 पोलीस उपनिरीक्षकांची आवश्यकता असताना  6951 कार्यरत आहेत.2708  पदे रिक्त आहेत. अपर पोलीस महासंचालकाची 25 पैकी 3, विशेष पोलीस महानिरीक्षक 47 पैकी 9, पोलीस उपमहानिरीक्षक 36 पैकी 5, पोलीस उपमहानिरीक्षक(तांत्रिक) 2 पैकी 2,पोलीस अधीक्षक/ पोलीस उपआयुक्त 265 पैकी 30, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) 686 पैकी 209, सशस्त्र पोलीस उप अधीक्षक 87 पैकी 50, पोलीस उपनिरीक्षक 9659 पैकी 2708, सहायक पोलीस निरीक्षक 4447 पैकी 471,सहायक पोलीस उपनिरीक्षक 18804 पैकी 1030, पोलीस हवालदार 42964 पैकी 2323, पोलीस शिपाई 96240 पैकी 4101 अशी पदे रिक्त आहे.पोलीस उपनिरीक्षक मोटर परिवहन यांची  सागरी सेकंड क्लास मास्टर आणि फर्स्ट क्लास इंजिन ड्राईवर यांची 270 पैकी फक्त 11 पदे कार्यरत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोटर परिवहन यांची 109 पैकी 54 पदे रिक्त आहेत.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून ताबडतोब पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. पोलीसांकडून भरीव कामगिरीची अपेक्षा केली जाते पण अपु-या अधिकारी आणि कर्मचारी वृंदामुळे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वृंदावर ताण पडतो आणि कामगिरिचा आलेख खालावित आहे.

   # धर्मनिहाय नियुक्ती होत नाही

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक मुख्यालयाकडे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वृंदात किती अधिकारी हिंदु, शीख, ईसाई आणि मुस्लिम समाजाचे आहेत, अशी माहिती मागितली असता पोलीस महानिरीक्षकांचे वरिष्ठ उप सहायक तथा शासकीय माहिती अधिकारी पं.कि.घुगे यांनी कळविले की राज्य पोलीस दलातील पोलीस अधिका-यांची नियुक्ती करतांना शासनाने आखून दिलेल्या जातप्रवर्गनिहाय आरक्षणाप्रमाणे पदोन्नती केली जात असुन ती धर्मनिहाय केली जात नसल्यामुळे सदरची माहिती कार्यासनात उपलब्ध नाही

No comments:

Post a Comment