मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाने राज्यातील राजकारण ढवळले जात असुन राज्यकर्ते सांगतात आहेत एक आणि नेमकी वस्तुस्थिति वेगळी असल्याचे धक्कादायक सत्य माहिती अधिकारामुळे समोर आले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे (एमएमआरसीएल) आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की मेट्रो 3 च्या प्रकल्पगस्तांचे पुर्नवसन चकाला, ओशिवारा, कुर्ला, विद्याविहार आणि वडाला येथे प्रस्तावित असून यामध्ये 2464 बांधकामे या प्रकल्पाच्या आडवी येत असून नया नगर, माहिम येथील 241 बांधकामे 100% आणि अन्य स्थानावरील पूर्णतः आणि अंशतः तोडली जाणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाइन 3 प्रकल्पाबाबत दिनांक 26 फेब्रुवारी 2015 रोजी विविध माहिती विचारली होती. एमएमआरसीएल ने अनिल गलगली यांना कळविले की कफ परेड ते आरे कॉलोनी या मधील 24 स्थानी 2223 तर नया नगर येथील 241 बांधकामे प्रकल्पाच्या आडवी येत आहेत. 2223 पैकी निवासी 1544, व्यावसायिक 576, निवासी कम व्यावसायिक 31 आणि अन्य 72 अशी संख्या आहे. सर्वाधिक फटका एमआयडीसी यास बसत असून येथील 628 बांधकामे तोडली जाणार आहेत. त्यानंतर 355 गिरगाव, 294 कालबादेवी ,264 बीकेसी, 262 आरे कॉलनी अशी क्रमवारी आहे.
शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रकल्पबाधितांचेपुर्नवसन 3 किलोमीटर रेडियसमध्ये कोठे करणार असल्याची माहिती विचारली असता एमएमआरसीएल ने पुन्हा स्पष्ट केले की मेट्रो 3 च्या प्रकल्पगस्तांचे पुर्नवसन चकाला,ओशिवारा, कुर्ला, विद्याविहार आणि वडाला येथे प्रस्तावित असून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमित झोपडीधारकांचे पुर्नवसन भक्ती पार्क,वडाळा आणि वंडरलैंड,ओशिवारा येथील एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये पुर्नवसन करण्याचे प्रस्तावित आहे. याठिकाणी 225 चौ.फू. क्षेत्रफळ असलेल्या सदनिका उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त मेसर्स एचडीआयएल यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे,तेथील सदनिका झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणामार्फत प्रकल्पगस्तांच्या पुर्नवसनासाठी प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.यामध्ये कुर्ला प्रीमियर (प), कुर्ला(पूर्व) येथील भंडारी मेटलउर्गिज़ च्या जवळील आणि मौजे चकाला व मूळगाव अंधेरी इत्यादी वरील ठिकाणाच्या सदनिका 269 चौ.फू. क्षेत्रफळ असलेल्या सदनिका उपलब्ध आहेत.
मेट्रो 3 अंतर्गत कालबादेवी स्टेशन आणि गिरगाव येथील संपूर्णरित्या तोडली जाणा-या बांधकामाची माहिती अनिल गलगली यांनी विचारली असता एमएमआरसीएल ने कळविले की गिरगाव स्टेशन येथील विठ्ठलदास बिल्डिंग, वीआयपी लगेज, अन्नपूर्णा निवास, क्रांति नगर, एकता सोसायटी, धूत पपेश्वर, श्री राम भवन, स्वामी निवास तर कालबादेवी येथील नर्मदाबाई ट्रस्ट, कोटकर बिल्डिंग 17, कोटकर बिल्डिंग 19, सबीना बिल्डिंग/ तलाठी हाउस, तोड़ीवाला बिल्डिंग, मुन्नालाल मेन्शन ए आणि बी, सोना चेम्बर, फिश मार्केट, हेम विला, चटवाल बिल्डिंग, खान हाउस, बिल्डिंग नं. 591, बिल्डिंग नं. 593, बिल्डिंग नं. 595, राजशीला बिल्डिंग, कापड़िया बिल्डिंग, चीरा बाजार 605 आणि चीरा बाजार 607 ही यादी आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या विरोधात एकही तक्रार एमएमआरसीएल या कंपनीला प्राप्त झाली नसुन बरेच अर्ज हे मोबदला आणि अन्य कामाचे आहेत.
मुंबई मेट्रो लाइन 3 प्रकल्पाबाबत सरकार आणि एमएमआरसीएल वेगवेगळे दावा करत असुन प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. सरकार एकाही प्रकल्पबाधितांचे पुर्नवसन होणार नसल्याचे सांगत आहे पण आरटीआयची माहिती विरोधाभास करणारी आहे, असे सांगत अनिल गलगली यांनी जनसुनावणी पेक्षा सर्वप्रथम योजना आणि प्रकल्पबाधितांचे पुर्नवसन याची माहिती ऑनलाइन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरसीएल ला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

No comments:
Post a Comment