Saturday, 9 May 2020

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास केव्हा मिळणार पूर्णकालिक पालिका उप आयुक्त?

मुंबईत करोना रुग्ण वाढत आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर प्रवेश देणे, उपचार करणे आणि सर्वंकष माहिती दिली जात नाही. यामुळे मुंबई महानगरपालिकेची प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागास आजही अर्धकालिक उपायुक्त असून पूर्णकालिक पालिका उप आयुक्त केव्हा मिळणार? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सहित मुख्य सचिव अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की आज राज्य सरकारने आरोग्य विभागासाठी एक नव्हे तर सात सनदी अधिकारी पाठविले आहेत. 1 आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त आणि 1 सह आयुक्त असे सनदी अधिकारी जोडले तर एकूण 11 सनदी अधिकारी सद्या मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे. पण दुर्दैवाने सार्वजनिक आरोग्य विभागात एकही पूर्णकालिक उपायुक्त नाही.

अनिल गलगली पुढे म्हणाले की सद्याचे उपायुक्त ज्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रभार दिला आहे ते सुधार विभागाचे पूर्णकालिक उपायुक्त आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका स्वतःच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करत आहे अन्यथा सार्वजनिक आरोग्य विभागात पूर्णकालिक उपायुक्त नक्कीच नेमला असता. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि नवनियुक्त आयुक्तांना आवाहन केले आहे की कमीतकमी पूर्णकालिक उपायुक्त नेमत अति महत्वाच्या सार्वजनिक आरोग्य विभागास महत्व देण्यात यावे.

No comments:

Post a Comment