मुंबई महानगरपालिका प्रशासनातील करोना बाधित अधिकारी व कर्मचा-यांची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली होती. अनिल गलगली यांच्या मागणीनंतर सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. पालिकेतील करोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती देण्याची जबाबदारी आता खातेप्रमुखांची आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत आणि प्रमुख कामगार अधिकारी सहदेव मोहिते यांनी दिनांक 20 मे 2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा देण्याचे काम पार पाडते. सद्यस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये कोरोना या रोगामुळे दिवसेंदिवस अधिक रुग्ण सापडत आहेत व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे खाते, विभाग आणि रुग्णालय स्तरावर महापालिका कर्मचारी कोरोना या रोगामुळे बाधित/मृत्यु होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अश्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांची माहिती संबंधित खातेप्रमुखांनी तत्काळ सादर करावी.
दिनांक 16 मे 2020 रोजी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली तक्रार करत प्रतिपादन केले होते की सर्व विभागाची माहिती सार्वजनिक झाली आहे पण मुंबई महानगरपालिका प्रशासनाची आकडेवारी लपविली जात आहे. गलगली यांची मागणी आहे की सर्वप्रथम जाहीर करावे की महापालिका अधिकारी व कर्मचारी रुग्णालयासहित करोना पॉजिटिव्ह रुग्ण किती आहेत, किती लोकांची चाचणी केली, किती विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात आहे. आज माहिती आणि आकडे नसल्यामुळे सर्व अधिकारी संभ्रमात आहे.
अनिल गलगली यांनी सर्व खातेप्रमुखांना आवाहन केले आहे की दररोज माहिती अपडेट केल्यास एकत्र आकडा सार्वजनिक करण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेला शक्य होईल.
No comments:
Post a Comment