कोविड19 टास्क फोर्सचे प्रमुख असलेले डॉ संजय ओक हे स्वतः माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून मुंबईतील कुठले रुग्णालय हे कोविड रुग्णालय असावे, याबाबत निर्णय घेत असताना त्यांच्या नजरेतून त्यांचेच प्रिन्स अली खान रुग्णालय कसे सुटले? हा चौकशीचा विषय असल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ह्या रुग्णालयास कोविड रुग्णालय घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसकडे केली आहे. 165 खाटांचे रुग्णालयाने चक्क कोविडलाच चकवा दिल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आणि पालिका आयुक्त प्रविनसिंह परदेशी यांस पाठविलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे की मुंबईतील नामांकित असलेले माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित करण्याची आवश्यकता आहे. आज वरळी आणि आसपासच्या परिसरातील कोविड रुग्णांना मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात पाठविले जाते. यामुळे वेळ वाया जातो. गलगली पुढे म्हणाले की विशेष म्हणजे सद्या या रुग्णालयात 165 खाटा असून फक्त 18 खाटा व्याप्त आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील रुग्णांना पूर्व किंवा पश्चिम उपनगरात पाठविण्याची कसरत थांबेल आणि कोविड रुग्णांना जवळच माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालय उपलब्ध होईल.
डॉ संजय ओक हे स्वतः प्रिन्स अली खान रुग्णालयाचे सीईओ आहेत आणि कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख असून त्यांचे त्यांच्याच 165 खाटांच्या रुग्णालयाकडे लक्ष कसे गेले नाही? यावर अनिल गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले.
No comments:
Post a Comment