मुंबईतील प्रवासी कामगारांमध्ये असलेलं विद्यार्थी, कामगार आणि अन्य नागरिकांना कुर्ला पूर्व येथील वन रुपी क्लिनिक येथे निःशुल्क वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. बुधवारी, 7 मे 2020 पर्यंत सेवा सुरु राहील.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3938439556196798&id=764999096874209
प्रवासी कामगारांना वैद्यकीय प्रमाणपत्राचा नियम लावत सरकारने अप्रत्यक्ष लुटण्यासाठी परवानगी दिली। डॉक्टरांकडून 100 रुपयांपासून ते 5000 रुपयांची वसुली सुरु होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गरिबांच्या लुटीबाबत वन रुपी क्लीनिकच्या डॉ राहुल घुले सोबत चर्चा केली आणि या प्रमाणपत्रासाठी शुल्क न आकारण्याची विनंती केली. वन रुपी क्लीनिक तर्फे यापूर्वी मोफत थर्मल टेस्टिंग करण्यात आली आहे. त्या संस्थेनी सहजपणे प्रस्ताव स्वीकारला. 4 मे पासून कुर्ला पूर्व येथे शुभारंभ सुद्धा केला असून बुधवार 6 मे पर्यंत सेवा सुरु असेल. अनिल गलगली यांच्या मते सरकार, पालिका आणि पोलिसांनी मूग गिळून गप्प बसल्यामुळे तक्रारीला अर्थच राहत नाही. यासाठी डॉक्टरांसाठी भ्रष्टाचाराला निःशुल्क वैद्यकीय प्रमाणपत्र देणं हे चांगले उत्तर आहे.
No comments:
Post a Comment