Sunday, 3 May 2020

कोविद रुग्णालयात बेड उपलब्धतेची माहिती एका क्लीकवर द्या

मुंबई महानगरपालिका अंतर्गत बेड व्यवस्थापन नसल्याने लोकांना तासनतास अंबुलन्स किंवा अन्य ठिकाणी रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यासाठी कोविद रुग्णालयात बेड उपलब्धतेची माहिती एका क्लीकवर देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की आज मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविद रुग्ण आढळून येत आहे. अश्यावेळी रुग्णांना मदतीची आवश्यकता असते. सद्या तरी एकही असे प्राधिकरण अस्तित्वात नाही जी बेडस उपलब्ध असलेल्या रुग्णालयाची सद्यस्थितीची माहिती एका क्लीकवर देऊ शकेल. मुंबईतील रुग्ण वाढल्याने सरकारने मोठ्या प्रमाणात सनदी अधिकारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पाठविले तरीही रुग्ण कमी झालेले दिसत नाही. एकंदरीत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याबाबतीत कोठल्याही प्रकाराची कार्यवाही न केल्याने सद्यस्थितीला कोविद रुग्णालय आणि अन्य खाजगी रुग्णालयाची माहिती मिळण्यासाठी सामान्य नागरिकांना जिकरीचे होत चालले आहे, असे सरतेशेवटी अनिल गलगली यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment