Friday 11 September 2015

पंतप्रधान यांच्या राष्ट्राच्या नावाने एका दिवसाच्या संदेशासाठी खर्च झाले 8.30 कोटी

26 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या नावाने जारी केलेला एका दिवसाच्या संदेश कोटयावधीचा होता. या संदेशासाठी झालेला खर्च तब्बल 8.30 कोटी असण्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली आहे. 'मन की बात' यावर कोटयावधीचा खर्च होत असताना देशात प्रथमच अश्याप्रकारचा राष्ट्राच्या नावाने नवा संदेश 26 मे 2015 रोजी जारी करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे 26 मे 2015 रोजी अर्ज करत विविध माहिती मागितली असता एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटीचे उप संचालक नितेश झा यांनी आकडेवारी आणि अचूक माहिती दिली नाही. या विरोधात गलगली यांनी दाखल अपील अर्जावर एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटीचे संचालक रवि रामा कृष्णा यांनी दखल घेतली. कृष्णा यांनी 14 टप्प्यात एकुण जारी केलेल्या 4094 जाहिरातीवर 8 कोटी 29 लाख 36 हजार 620 रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे. या जाहिराती बनविण्याचे काम कोणत्या कंपनीने केले आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती अनिल गलगली यांनी विचारली असता स्पष्ट केले की सदर जाहिरात एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटीची रचना आहे . राष्ट्राच्या नावाने संदेश देण्याच्या नियमाची आणि कोण कोणत्या दिवशी असा संदेश देण्याचा नियम आहे, अशी माहिती गलगली यांनी विचारली असता कृष्णा यांनी सांगितले की सक्षम अधिकारी यांच्यामार्फत प्रसंग, महत्त्व आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जातो. राष्ट्राच्या नावाने संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या आदेश किंवा निर्देशाची प्रत मागितली असता कृष्णा यांनी भारत सरकारच्या (कार्य वितरण) नियमांनुसार हया जाहिराती जारी करण्यासाठी एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटी ही सक्षम प्राधिकरण आहे. सरकारी जाहिरातीचे दर हे सामान्य व्यक्तीला आकारण्यात येणा-या जाहिरातीच्या तुलनेत फारच कमी आहे. इतकी मोठी रक्कम खर्च केली गेली आणि त्याचा सामान्य जनतेस कोणताही लाभ नसल्याचे प्रतिपादन अनिल गलगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment