Wednesday, 20 May 2015

चुकीचा असूनही मुंबई विकास आराखडयातंर्गत पालिकेने कमविले 60 लाख

मुंबई विकास आराखडा लक्षणीय चुका आणि जनतेच्या विरोधामुळे गाजला असताना 6839 नागरिकांनी विविध आरक्षणाचा अहवाल ,आराखडा शीट आणि आराखडा अभिप्रायासाठी तब्बल 60 लाख मोजल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस विकास नियोजन खात्याने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विकास आराखडयातंर्गत पालिकेकडे आलेल्या अर्जाची, अदा केलेल्या शुल्काची आणि माहिती विचारली होती. पालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी अनिल गलगली यांना कळविले की मुंबई विकास आराखडयातंर्गत विकास नियंत्रण नियमावली पुस्तिका, आराखडा अहवाल, आराखडा शीट आणि आराखडा अभिप्रायच्या विक्रीपोटी एकुण 59 लाख 48 हजार 87 रुपये रक्कम जमा झाले आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम 39 लाख 5 हजार 312 रुपये विकास आराखडा अभिप्रायाची विक्री करुन जमा झाले आहे. एकुण 2220 लोकांनी विकास आराखडा अभिप्राय विकत घेतला. त्यानंतर 4130 लोकांनी विकास आराखडा शीट विकत घेत 13 लाख 950 रुपये पालिकेस अदा केले. 312 विकास नियंत्रण नियमावली पुस्तिका विक्रीमागे 4 लाख 25 हजार 880 रुपये जमा झाले तर विकास आराखडा अहवाल 177 लोकांनी विकत घेत पालिकेस 3 लाख 15 हजार 945 रुपये अदा केले. मुंबई विकास आराखडयातंर्गत प्राप्त सूचना आणि हरकती बाबत विचारले असता अनिल गलगली यांस कळविण्यात आले की 27 एप्रिल 2015 पर्यंत 64 हजार 867 इतक्या सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत. मुंबईचा विकास आराखडयात झालेल्या लक्षणीय चुकामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 महिन्याच्या आत चुका दुरुस्त करत नवीन आराखडा आणण्याचे दिलेले आदेश पहाता 6839 नागरिकांनी विकत घेतलेल्या विविध विकास आराखडा याची माहिती सुद्धा चुकीची असणार, त्यामुळे त्या नागरिकांचे पैसाचा परतावा करण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

No comments:

Post a Comment