Monday 22 June 2015

पीडब्ल्यूडीच्या घोर चुकीमुळे सेशन कोर्टातील खंडित वीजपुरवठयाचा सलमान खानला झाला लाभ

हिट एंड रन केसमध्ये दोषी ठरलेला सलमान खान आज जामीनावर वावरत आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे त्यास जलदगतीने जामीन मिळाला असून यामध्ये राज्य सरकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. सेशन कोर्टात वीज पुरवठा खंडीत न होण्यासाठी आपातकालीन व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी ज्या पीडब्ल्यूडी विभागाची आहे त्यात ती फेल झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनास मुंबई शहर येथील सेशन कोर्टात सलमान खानच्या सुनावणी दरम्यान खंडीत झालेल्या वीजपुरवठयाबाबत विविध माहिती विचारली होती. बेस्टच्या ग्राहक सेवा विभागाने अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 6 मे 2015 रोजी दुपारी 13.01 ते 13.27 अशी 26 मिनटे वीजपुरवठा खंडीत झालेला होता.दुपारी 13.10 वाजता दूरध्वनी क्रमांक 22020218 वरुन तक्रार प्राप्त होताच बेस्टने त्यास अटेंड केले. म्यूजियम डीएसएस येथे टर्मिनेशन तसेच अपोलो टीआर नंबर 4 येथे ट्रिपिंग झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत  झाला होता ज्यास अपोलो टीआर नंबर 4 मधुन वीजपुरवठा पूर्ववत केला. या 26 मिनटाचा फायदा घेत खानच्या वकिलाने त्याचदिवशी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळविला. वीजपुरवठा खंडीत झाला नसता तर खानला जामीन मिळाला नसता आणि तुरुंगात जाण्याची पाळी आली असती. असे सांगत अनिल गलगली यांनी पीडब्ल्यूडी विभागावर आरोप केला की सेशन कोर्टात वीज पुरवठा खंडीत न होण्यासाठी आपातकालीन व्यवस्था  पीडब्ल्यूडी तर्फे पुरविली गेली असती तर वीजपुरवठा खंडीत झाला नसता. बेस्ट प्रशासनाचे साफ म्हणणे आहे की सेशन कोर्टात वीज पुरवठा खंडीत न होण्यासाठी यूपीएस सिस्टम आणि जनरेटरची आपातकालीन व्यवस्था करणे पीडब्ल्यूडीची जबाबदारी होती कारण सेशन कोर्टात वीजपुरवठयाचे परिरक्षण त्यांच्या तर्फे केले जाते. गेल्या 1 वर्षात 4 वेळा वीज पुरवठा खंडीत झाला असतानाही पीडब्ल्यूडीने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच सलमान खानला जामीन मिळण्यास खंडीत वीजपुरवठा पोषक ठरली. सेशन कोर्ट हे बेस्ट प्रशासनाचे अति महत्वाचे ग्राहक असूनही याबाबतीत त्यांचीही चूक दुर्लक्षित केली जाऊ शकत नसल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे म्यूजियमपासून 100 मीटरच्या अंतरावर बेस्ट मुख्यालय असताना खंडीत वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 26 मिनटे लागणे,ही बाब सुद्धा खटकणारी आहे, असे अनिल गलगली यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment