Wednesday 28 November 2018

मुंबईत प्रतिदिन ३ नागरिकांना डेंग्यूची लागण 

मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रतिदिन ३ नागरिकांना डेंग्यूची लागण होत आहे तर ३७ संशयित डेंग्यूचे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या ३५ महिन्यात ३८ मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यु झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या ३ वर्षात मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने अनिल गलगली यांस वर्ष २०१६, वर्ष २०१७, ११ नोव्हेंबर २०१८ या ३५ महिन्यांची माहिती दिली. डेंग्यूचे निश्चित रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची आकडेवारी दिली. यात निश्चित डेंग्यूचे रुग्ण वर्ष २०१६ मध्ये ११८०, वर्ष २०१७ मध्ये ११३४ तर १ जानेवारी २०१८ पासून ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९४५  इतके होते तर वर्ष २०१६ मध्ये ०७ , वर्ष २०१७ मध्ये १७ आणि ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४ इतके रुग्ण डेंग्यूने मृत्यूमुखी पडले. संशयीत रुग्णाची संख्या वर्ष २०१६ मध्ये १३२१३ , वर्ष २०१७ मध्ये १२९१३ तर यावर्षीच्या ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १३१३८ इतकी आहे.

एकंदरीत प्रतिदिन ३ निश्चित आणि ३७ संशयित डेंग्यूचे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या ३५ महिन्यात ३८ मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यु झाला असून प्रत्येक महिन्याला सरासरी १ रुग्ण डेंग्यूने मृत्यु पावतो. अनिल गलगली यांच्या मते ज्या पध्दतीने सार्वजनिक आरोग्य खात्याने जनजागृती करणे आवश्यक आहे ती योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना डेंग्यूच्या बाबतीत सरळ व स्पष्ट माहिती नाही. 


No comments:

Post a Comment