Friday 16 November 2018

मुंबईचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यासाठी १३.५९ कोटींचा खर्च

बहुप्रतिक्षित असा मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. यात फक्त विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर  ४६.५५ लाख खर्च झाले आहेत तर सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिका-यांच्या मानधन आणि सुविधावर २० लाख खर्च करण्यात आले आहे.

मुंबईचे आयुक्त सिताराम कुंटे यांच्या कारकिर्दीत तयार केलेला मुंबईचा प्रारुप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केला होता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचा प्रारुप विकास आराखडा म्हणजे डीपी (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पालिकेच्या विकास नियोजन खात्याने अनिल गलगली यांस माहिती दिली की मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (२०३४) पुर्नरचनेसाठी आजमितीपर्यंत १३ कोटी ५९ लाख आणि ५६ हजार खर्च करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित केलेल्या मुंबईचा प्रारुप विकास आराखडयावर (२०३४) ५ कोटी ६० लाख ५ हजार खर्च केले आहे ज्यात २५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित आराखडयाच्या कामासाठी नेमलेले सल्लागार मेसर्स इजिस जियोप्लानला ३.४२ कोटी अदा केले आहे. एमबी ग्राफिक्स आणि प्रिंटमोअर या कंपनीला ९६ लाख, मेसर्स एडीसीसीला १ कोटी १३ लाख, वीके पाठक सल्लागार आणि इन्फॉरमल समितीच्या सदस्यांना ७ लाख ९० हजार आणि मेसर्स विदर्भ इन्फोटेकला २०१५ मध्ये स्वीकारलेल्या सूचना आणि हरकतीच्या अनुषंगाने डेटा एंट्री कामासाठी १६ लाख  अदा केले आहे.

सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१५ मध्ये एकूण १.९१ कोटी खर्च केले गेले आहे. विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांच्या मे २०१५ पासून मे २०१६ या कालावधीत वेतनावर १६.५५ लाख खर्च झाले आहे आणि त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या संगणकावर ४६ हजार खर्च केले आहे. कंसल्टेट फॉर डीसीआर टीमचे कांजलकर यांस ३ लाख ७० हजार आणि इंफॉर्मल समितीच्या सदस्यांना २ लाख दिले आहे. मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे उपलब्ध केलेल्या विविध प्रकारच्या  मनुष्यबळासाठी ३ कोटी ३५ लाख ५५ हजार अदा केले आहे. बैटरी बैकअपसाठी मेसर्स एनएम सिस्टमला २९ हजार अदा केले आहे.

२७ मे २०१६ राजी प्रकाशित सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१४-२०३४ मध्ये ६ कोटी ८ लाख ६ हजार खर्च करण्यात आले आहे. यात विशेष कार्य अधिकारी असलेले रमानाथ झा यांस जून २०१६ पासून सप्टेंबर २०१८ या कालावधीत वेतन रुपाने ४० लाख अदा केले आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत प्राप्त सूचना आणि हरकतीवर आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या समितीच्या ३ सदस्यांवर १९ लाख ९९ हजार ख़र्च करण्यात आले असून यात सर्वश्री गौतम चटर्जी, सुरेश सुर्वे आणि सुधीर घाटे यांचा समावेश आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत जाहिरातींवर १४.८३ लाख खर्च करण्यात आले आहे तर जेवणावर २ लाख ८३ हजार खर्च करण्यात आले आहे. यात ३१ जुलै २०१७ रोजी महापालिकेच्या मंजूरीच्या अनुषंगाने महापालिका सदस्यांना भोजन व्यवस्थेवर १ लाख ६५ हजार खर्च करण्यात आले आहे.

 मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१४-२०३४ प्रदर्शित करण्यासाठी परवाना खरेदी करण्यासाठी मेसर्स आर्क जीआयएस सर्वर एंडहांस इंटरप्राइजेस या कंपनीला १ कोटी २६ लाख अदा करण्यात आले आहे. सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१४-२०३४ याचा नकाशा प्रिंटिंग करण्यासाठी ४६ लाख ९ हजार मेसर्स जयंत प्रिंटरी एलएलपी या कंपनीला अदा करण्यात आले आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१४-२०३४ च्या अनुषंगाने तातडीच्या कामासाठी १० लाख ५७ हजार खर्च करण्यात आले आहे.

अनिल गलगली यांनी या खर्चास भरगच्च सांगत टीका केली की  पहिला मुंबईचा प्रारुप विकास आराखडा २०१४-२०३४ व्यवस्थित तयार केला गेला असता तर टॅक्सच्या रक्कमेतून उभारली जाणारी इतकी प्रचंड रक्कम खर्च झाली नसती.


No comments:

Post a Comment