Friday, 10 April 2015

मुंबईच्या 5 टोलनाक्यापासून मुंबईकरांना केव्हा मुक्ति मिळणार ?


संपुर्ण राज्यातील टोल बाबत विचार करताना राज्य सरकारने देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरास अद्याप पर्यंत प्राधान्य दिले नाही। मुंबईच्या 5 टोलनाक्यापासून मुंबईकरांना केव्हा मुक्ति मिळणार ?असा थेट सवाल  आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस केला आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मते मुंबईच्या 5 टोलनाक्यावर आजही टोल घेतला जात आहे. मुंबईतील रस्ते आणि पुलाचे बांधकाम पालिकेने केले असताना टोल राज्य सरकार वसूल करते.  ही बाब अन्यायकारक असुन मुंबईकरांना या मनमानी आणि जाचक टोल पासुन मुक्त करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी यापासून मुंबईकरांना मुक्ति देण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment