Monday, 27 January 2020

माहिती अधिकार कायद्याच्या वापर सगळ्यांनी केला पाहिजे- शैलेश गांधी

वर्षांनुवर्षे जे माहिती अधिकार कार्यकर्ते आरटीआय अॅक्टिव्हिस्ट फोरम बरोबर जोडले गेले आहेत, अश्या कार्यकर्त्यांची आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कामांची  फोरमने दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. ग्रामीण भागातुन आलेल्या आरटीआय कार्यकर्त्यांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले. 


माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी प्रतिपादन केले की माहिती अधिकार कायद्याच्या वापर सगळ्यांनी केला पाहिजे. माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती वाढली पाहिजे. माहिती अधिकार कायद्याच्या सगळ्या कलमांचे वाचन केले पाहिजे. कारण कायदा वापरतांना आपल्याला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कसा आणि कुठं वापर करावा हयावर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार अर्ज करतांना मुद्देसूद मांडणी केली पाहिजे. जेणेकरुन जनमाहिती अधिकाऱ्यांना आपण मागितलेली माहिती देणे सोपे जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट ओपन करून रोज निघणाऱ्या शासन आदेशांचे वाचन केलं पाहिजे. तरच तुम्ही माहिती अधिकार कायद्याच्या योग्य वापर करू शकता. 

आरटीआय कार्यकर्ते भास्कर प्रभू यांनी यांनी माहिती अधिकार कायद्यातील सर्व कलमाची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला असण्याची आवश्यकतेवर जोर दिला. डॉ संजय लाखे पाटील यांनी आरटीआयचा वापर करत शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नावर केलेल्या कामाची माहिती दिली. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे पोलिस प्रशासनाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. पोलिस प्रशासनातील काही मोजक्या लोकांमुळे जनतेत गैरसमज निर्माण होतो. काही कलमांचा वापर कसा आणि कुठे होतो याची माहिती तुपे सरांनी कार्यकर्त्यांना दिली. विभिन्न विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात भरपूर लोकांनी वरील तज्ञ मंडळींना प्रश्न विचारले आणि आपल्या शंकेचे निवारण करून घेतले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरटीआय अॅक्टिव्हिस्ट फोरमचे अध्यक्ष सुधाकर काश्यप यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संतोष सावर्डेकर, गणेश उंडाले, अनुप मडये, राजेश मोरे, मुरलीधर परदेशी, राजन पवार, सुफियांन पेणकर,आयुब शेख यांनी परिश्रम घेतले.

2 comments: