अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत श्री साईबाबा संस्थान, शिर्डी याकरिता 10 मेगावॉट क्षमतेची सोलर पीव्ही सिस्टिम उभारणीकरिता कंत्राटदार मिळेनासा झाला असून याकामी 4 वेळा जाहिराती दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस संस्थानच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. 17 महिने उलटूनही कंत्राटदार मिळाला नसला तरी या जाहिरातीवर तब्बल 2,47,388 रुपये खर्च करण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांस माहिती विचारली होती की अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत श्री साईबाबा संस्थान, शिर्डी याकरिता 10 मेगावॉट क्षमतेची सोलर पीव्ही सिस्टिम उभारणीकरिता दिलेल्या जाहिरातीचा आणि कंत्राटदारांचा तपशील देण्यात यावा. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या जनसंपर्क विभागाने अनिल गलगली यांस कळविले की एकूण 4 वेळा जाहिराती देण्यात आल्या आहेत. दिनांक 8 सप्टेंबर 2018, 7 नोव्हेंबर 2018, 4 जानेवारी 2019 आणि 23 जून 2019 रोजी जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या जाहिरातीवर एकूण 2,47,388 रुपये खर्च करण्यात आले आहे.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस पत्र पाठवून मागणी केली आहे ज्या पद्धतीने जाहिरातीवर जाहिराती देत पैसे खर्च केले जात आहे त्या अनुषंगाने शिर्डी संस्थान अपारंपरिक ऊर्जेसाठी उत्सुक आहे का? याची चौकशी करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला लाखों रुपयांचे नुकसान वीजेवर होत असून सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या दानाचा दुरुपयोग होत असल्याचे परखड मत अनिल गलगली यांनी मांडले आहे.
No comments:
Post a Comment