Friday 28 August 2015

मुस्लिमांची लोकसंख्या वाढली पण हज जाणा-यांच्या कोटयात घट

देशात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असताना भारतातून  हज यात्रेला जाणा-यांच्या कोटयात 21 टक्यांची लक्षणीय घट झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस हज कमिटी ऑफ़ इंडिया ने दिली आहे. गेल्या वर्षी 99,914 जण हज यात्रेस गेले असून उत्तर प्रदेशातून सर्वाधिक तर खालोखाल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातून हज यात्रेस जाणा-यांची संख्या आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हज कमिटी ऑफ़ इंडिया कडे हज यात्रेच्या अनुषंगाने विविध माहिती विचारली होती. प्रत्येक मुसलमान हा आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करण्याचे स्वप्न उराशी बागळतो. हज कमिटी ऑफ़ इंडियाचे जन माहिती अधिकारी अब्दुल शेख यांनी अनिल गलगली यांस वर्ष 2011 ते वर्ष 2014 या 4 वर्षातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातून आहे वर्ष 2014 मध्ये 99,914 पैकी 24,622 एकटया उत्तर प्रदेशातून होते. खालोखाल पश्चिम बंगालचा दूसरा क्रमांक आहे. पश्चिम बंगालातून ही संख्या 9,358 इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्र (8,490), जम्मू आणि कश्मीर ( 6,984), केरला (6,517),बिहार (6,224), आंध्र प्रदेश ( 5,775), कर्नाटक (5,337),  राजस्थान (3,942) आणि गुजरात ( 3,779) अशी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे यात सरकारी कोटा फक्त 500 असून 468 लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. वर्ष 2011, वर्ष 2012 आणि वर्ष 2013 च्या तुलनेत वर्ष 2014 मध्ये 20 ते 25 हजारांची लक्षणीय घट झाली आहे. वर्ष 2011 मध्ये 3 लाख2 हजार 616 लोकांनी अर्ज केला असता 1 लाख 25 हजार कोटा अंतर्गत 1 लाख 24 हजार 901 लोक हज यात्रेवर जाऊ शकले. वर्ष 2012 मध्ये कोटयात फक्त 110 ची वाढ झाल्यामुळे ही संख्या 1 लाख 25 हजार 110 इतकी झाली. त्यावर्षी 3 लाख 7 हजार 309 अर्ज आले असून 1 लाख 25 हजार 64 लोकांना हज जाण्याची संधी मिळाली. वर्ष 2013 मध्ये कोटा कमी झाल्यामुळे 1 लाख 21 हजार 420 या कोटयासाठी जरी 2 लाख 98 हजार 325 अर्ज आले असले तरी 1 लाख 21 हजार 338 लोकांना हज यात्रा करु शकले. वर्ष 2014  मध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे 1 लाख 104 इतकाच कोटा मंजूर झाला त्यापैकी 99 हजार 914 लोकांना हज यात्रेस जाण्याचे भाग्य प्राप्त झाले. वर्ष 2011 च्या तुलनेत वर्ष 2014 मध्ये 21 टक्यांची घट झाली आहे. अनिल गलगली यांच्या मते सऊदी प्रशासनाशी बोलणी करुन हा कोटा वाढविण्यासाठी भारताने दबाव बनविला पाहिजे. # महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज जरी सर्वाधिक कोटा उत्तर प्रदेशाच्या वाटयास आहे पण प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज प्राप्त होण्याचा रिकॉर्ड आहे. वर्ष 2011 ते वर्ष 2013 या 3 वर्षात 1 लाख 21 हजार 957 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 32 हजार 790 लोकांना हज यात्रेवर जाण्याचे नशीबात होते. # सरकारी कोटा झाला कमी मूळ कोटा कमी होत पहाता केंद्र सरकारने सुद्धा स्व:ताचा कोटा एकदम कमी करत 500 वर आणला. वर्ष 2011 मध्ये 6760, वर्ष 2012 मध्ये 735, वर्ष 2013 मध्ये 500 आणि  वर्ष 2014 मध्ये 500 अशी संख्या घटली आहे. # सूटकेस वर 51 कोटी खर्च हज यात्रेवर जाणारे सर्वानी एकाच प्रकारची सूटकेस आणावी, अशी सऊदी प्रशासनाची ताकीद असल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने मेसर्स वीआयपी इंडस्ट्रीजला 2 लाख सूटकेस पूर्तता करण्याचे कंत्राट बहाल केले. प्रति 2 नग सूटकेस साठी रु 5100/- हा दर निश्चित झाल्यामुळे 51 कोटीचा व्यवहार होत असून सदर रक्कम हज जाणा-या यात्रेकरुनांच अदा करावी लागते.

No comments:

Post a Comment