Monday, 3 August 2015
बेस्टला दररोज 2.26 कोटीचे नुकसान
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रशासनला दररोज 2.26 कोटीचे नुकसान होत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाकडे प्रति किलोमीटर येणारा खर्च, प्रवासी भाडे उत्पन्न आणि एकुण प्रवासी संख्या अशी माहिती विचारली होती. बेस्ट प्रशासनाचे सहाय्यक आगार व्यवस्थापक अभय शेलार यांनी अनिल गलगली यांस कळविले की दररोज सरासरी 28.39 लाख प्रवासी प्रवास करतात. बसप्रवर्तनाचा एकूण दैनंदिन खर्च रु 6.16 ( मे, 2015 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार ) कोटी आहे आणि प्रति किलोमीटर खर्च रु 97.75 इतका आहे. तसेच प्रवाशांकडून आकारण्यात येणा-या प्रवासभाडयाच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाला प्राप्त होणारे दैनंदिन उत्पन्न जून 2015 च्या आकडेवारीनुसार रु 3.90 कोटी एवढे आहे. दररोज बेस्टला रु 2.26 कोटीचे सरळ नुकसान होत आहे. सद्या बसचे भाडे कमीत कमी रु 8 साध्या, रु 8 लिमिटेड आणि रु 10 एक्सप्रेससाठी आहे तर एसी बस सेवेसाठी रु 30 आहे.
अनिल गलगली यांनी प्रचंड तोटा सहन करुनही लाखों मुंबईकरांना 'बेस्ट' सेवा देणा-या बेस्ट प्रशासनाचे कौतुक करत मुंबईतील गर्दी आणि वर्दळीच्या मार्गावर 'बेस्ट डेडिकेटेड मार्ग' बनविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसकडे केली जेणेकरुन ट्रैफिक जाममुळे होणारे दररोजचे लाखों रुपयांची बचत होईल आणि बेस्ट प्रवासी संख्येत सुद्धा वाढ होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment