Monday 23 March 2020

मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिका-यांस तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करा

मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा लोन बेसिस वर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यास तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय आपत्कालीन सुरु असून मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा लोन बेसिस वर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यास तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करत सेवा घेण्याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसकडे केली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांस पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की आज महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात डॉक्टराची आवश्यकता आहे. अनेक आरोग्य संस्थांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय रुग्णालये, उपकेंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालये यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तसेच तद्न्य डॉक्टरेस ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कोरोना व्हायरस मुळे होणाऱ्या आजाराने मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते असे आज एकंदरीत जागतिक परिस्थितीवरून लक्षात येत आहे. या सर्व बाबींमुळे जनतेच्या मनात भय आणि चिंता निर्माण झाली आहे.

असे असताना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स मंत्रालयात मंत्री, राज्यमंत्री यांचेकडे प्रतिनियुक्तीवर, लोन बेसिसवर किंवा अन्यप्रकारे कार्यरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. अश्या परिस्थितीत जे डॉक्टर आपले मूळ कर्तव्ये सोडून आज विविध ठिकाणी कार्यरत आहे. मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यास त्या कर्तव्यातून मुक्त करत तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करण्याची कार्यवाही आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवेचा लाभ अश्या आपत्कालीन परिस्थितीत मिळू शकतो,असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

#अनिलगलगली #मुंबई #वैद्यकीयआपत्कालीन #महाराष्ट्र

No comments:

Post a Comment