Thursday, 12 March 2020

125 मंडळाने एकत्रित येत कुर्ल्यात साजरा केला श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव

न्यु भारत क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती कुर्ला (प.) आयोजिय भव्य दिव्य मिरवणूक सोहळा कुर्ला (प.) येथे पार पडला. 125 मंडळे एकत्र येऊन एकत्रित शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. 

सर्वेश्वर मंदीर स्थानी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला (प.) च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. अनावरण करताना पोलीस उपायुक्त नियती दवे, दत्तात्रय शिंदे, आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली , ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा प्रभुदेसाई, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, उमेश गायकवाड, दत्ता गव्हाणे, गणेश शेळके, किरण दामले आणि कुर्ला नागरिक बँकेचे अध्यक्ष किसन मदने उपस्थित  होते. हे बोधचिन्ह कुर्ल्यातील कलाकार मिलिंद सुर्वे यांनी बनवले आहे.

मिरवणूक भव्य दिव्य प्रमाणात साजरी झाली. हजारोंच्या संख्येने पारंपारिक वेशात महिला व उपस्थित होते. घोड्यावर स्वार असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज व मावळे आकर्षणाचे केंद्र होते. कुर्ल्यातील एकत्रित शिवजयंती ने संपूर्ण मुंबईभर कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे व कुर्ल्याची एक नवी ओळख निर्माण होणार आहे असे समितीला वाटते. विशेष म्हणजे सर्वत्र भगवामय वातावरण होते आणि सर्व मंडळांनी आपापल्या परिसरात रांगोळी आणि अन्य आकर्षक देखावे व सजावट करत जन्मोत्सव साजरा केला.


No comments:

Post a Comment