Monday 3 June 2019

दरदिवशी 11 मुंबईकर प्राप्त करतात मतदार उतारा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामासाठी वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादीतील उतारा महत्वाचा असून दरदिवशी 11 मुंबईकर मतदार उतारा प्राप्त करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. गेल्या 3 वर्षात एकूण 12,486 मतदार उतारा वितरित करण्यात आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक खात्याकडे मागील 3 वर्षात मतदार यादीतील नावाच्या उता-यासाठी प्राप्त झालेल्या शुल्काची माहिती विचारली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक खात्याचे प्रशासकीय निवडणूक अधिकारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 2016-2017 या वर्षात एकूण 4121 उतारे देण्यात आले असून एकूण शुल्क रु 4,98,461 प्राप्त झाले आहे. वर्ष 2017-2018 या वर्षात 4135 मतदार उता-यासाठी एकूण  रु 5,90,336 रुपये इतके शुल्क प्राप्त झाले आहे तर वर्ष 2018-2019 या कालावधीत 4230 मतदार उतारे देण्यात आले असून यासाठी मुंबई महानगरपालिकेने रु 7,00,347 इतकी रक्कम शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहे.

निवडणूक खात्याने गलगली यांस पुढे कळविले की  वर्ष 1960, वर्ष 1967, वर्ष 1972, वर्ष 1978, वर्ष 1985, वर्ष 1992, वर्ष 1997, वर्ष 2002, वर्ष 2007, वर्ष 2012, वर्ष 2017 ची मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत नागरिकांना मतदार यादी तपासणीसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतात आणि नागरिकांनी मागणी केल्यास मतदार यादीचा उतारा शुल्क आकारुन देण्यात येतो. वर्ष 1960, वर्ष 1967 आणि वर्ष 1972 मतदार यादीतील काही पुष्ठे लाखों नागरिकांनी हातळण्यामुळे अतिजीर्ण अवस्थेत स्थितीत आहे. वर्ष 1978, वर्ष 1985, वर्ष 1992, वर्ष 1997, वर्ष 2002, वर्ष 2007, वर्ष 2012, वर्ष 2017 च्या मतदार याद्या त्यावेळेच्या सार्वत्रिक विधानसभा यादीवरुन तयार करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment