Wednesday, 5 December 2018

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रति मतदार पालिकेने  खर्च केले रु ७९.४६ 

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक- फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत एकूण खर्च रु ७२.९४ कोटी करण्यात आले असून प्रति मतदारांवर पालिकेने रु ७९.४६ इतकी रक्कम खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा रु २४.६८ कोटी मतदानाच्या साहित्यांवर खर्च करण्यात आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे माहिती मागितली होती की पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक- फेब्रुवारी २०१७ या निवडणुकीत किती रक्कम खर्च करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाचे जन माहिती अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक आणि नगरशुल्क अधिका-यांने अनिल गलगली यांस राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या ३ पानी अहवालाची प्रत दिली आहे. या अहवालात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानधनावर रु ८ कोटी ६७ लाख ८५ हजार आणि ३२५ खर्च करण्यात आले आहे. यात २५ निवडणूक निर्णय अधिकारी, २५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ४३ निवडणूक निरीक्षक आणि ४२०० निवडणूक कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या मानधनावर रक्कम खर्च केली आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पारिश्रमिकावर रु ६ कोटी २४ लाख ६३ हजार ५५० इतनी रक्कम देण्यात आली आहे. यात ४८ निवडणूक निर्णय अधिकारी, ५५० सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ४१,९८० मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचारी, मतमोजणीसाठी २२३८ कर्मचारी, ९०६२ निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी, ४९ निवडणूक निरीक्षक आणि ९१२६ पोलिसांना पारिश्रमिक या नात्याने रक्कम देण्यात आली आहे.

मतदान साहित्यांवर रु २४ कोटी ६८ लाख ५ हजार २३८ खर्च करण्यात आले आहे. यात मतदान केंद्रावर साहित्यावर रु ९ कोटी ९९ लाख ३७ हजार आणि २७० खर्च करण्यात आले आहे. पंडाळवर रु १३ कोटी २४ लाख ४८ हजार आणि ४९२ रक्कम खर्च करण्यात आली आहे.ईव्हीएम आणि अन्य साहित्याच्या हमालीवर रु २७ लाख ३५ हजार आणि ७३७ खर्च करण्यात आले आहे. संगणक आणि अन्य साहित्यावर रु २९ लाख ६२ हजार आणि २३५ रक्कम खर्च करण्यात आली आहे. मार्कर पेनवर रु ८० खर्च करण्यात आले आहे. वाहनांवर रु ६ कोटी ५७ लाख ९७ हजार आणि २०३ इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. प्रशिक्षणावर रु १५ लाख २ हजार ४८० खर्च झाले आहे. मतदान जागृतीवर रु २ कोटी ९२ लाख ५ हजार १२९ रक्कम खर्च करण्यात आली आहे. प्रभाग रचनासाठी रु ३६ लाख ३८ हजार, आचारसंहितासाठी रु १५ कोटी १० लाख ७८ हजार ६५३, कार्यालयीन खर्च रु ४ कोटी ४९ लाख ९९ हजार ६५, मतदान चिठ्ठीसाठी रु ६१ लाख ७३ हजार ३६२,  निवडणुकीत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणारे अपघात रु २० लाख ६० रुपये आणि अन्यवर ८४ लाख ७९ हजार ६१० खर्च करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला रु २ कोटी ५ लाख ५८ हजार ७५४ दिले आहे.

पालिका निवडणुकीत ९१ लाख ८० हजार ५५० मुंबईकरांनी मतदान केले. प्रति मुंबईकर रु ७९.४६ रक्कम खर्च झाली आहे. अनिल गलगली यांच्या मते रु ३.५४ कोटी मतदान जागृती आणि चिठ्ठी वाटपावर खर्च करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत एसएमएस द्वारा मतदान केंद्रांची माहिती दिल्यास ते अधिक योग्य ठरेल.

No comments:

Post a Comment