मुंबई महानगरपालिकेच्या अख्यत्यारीत येणारी सार्वजनिक आरोग्य खात्यात रुग्णालयात महत्वाची दुवा ठरणारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही 67 आणि औषध निर्माता ही 62 पदे रिक्त असल्यामुळे सामान्य रुग्णांना खाजगी सेवा घेण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ या पदाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे सह प्रमुख कर्मचारी अधिकारी ( आरोग्य ) मीनल पानट यांनी अनिल गलगली यांस एकूण पदे आणि रिक्त पदांची आकडेवारी दिली. या आकडेवारीच्या अनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही एकूण 203 पदे असून 67 पदे रिक्त आहेत तर औषध निर्माता ही 62 पदे रिक्त असून एकूण पदाची संख्या 234 आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ या पदाची एकूण संख्या 14 असून फक्त 1 पद रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता ही पदे महत्त्वाची असून सामान्य रुग्णांना नाईलाजाने बाहेरील खाजगी सेवा घेण्यासाठी प्रवृत्त केले जात असून जाणूनबुजून ही पदे रिक्त ठेवल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता ही दोन्ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment