Sunday, 2 September 2018

घराघरात जाऊन मतदानाचे महत्व सांगत लोकांना प्रेरणा देणार विद्यार्थी

निवडणूक आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत चांदीवलीत शालेय विद्यार्थ्यांनी मतदार अभियानात भाग घेतला. यावेळी मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यापासून अन्य बाबीवर मार्गदर्शन करण्यात आले.घराघरात जाऊन मतदानाचे महत्व सांगत लोकांना विद्यार्थी प्रेरणा देणार आहेत.

साकीनाका येथील ईडन हायस्कूल आणि ज्युनियर महाविद्यालयात अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली आणि नित्यानंद गुरु एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष रवी नायर यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार जागकर, अनिल गलगली, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, रवी नायर, नरेश यादव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शुभ्रांशु दीक्षित, दिनेश मधुकुंटा, मनोज यादव, बाबू बतेली, सुभाष गायकवाड, राम साहू, संतोष त्रिपाठी, अण्णा परब, बाळासाहेब पाटील, सुभाष विश्वकर्मा, राजकुमार विश्वकर्मा, अजीज खान, विकास शेळके, राजकुमार दीक्षित, किशोर ढमाल, अमीन शाह, नंदू साळुंखे, अशोक सिंह, फरीद खान, रत्नाकर शेट्टी, सलीम खान, शकील शेख, इसाक शेख, अनवर कमाल, बलवंत कुबल, संजय सोलंकी, दीपक सूर्यवंशी आणि समस्त चांदीवली मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment