Friday, 27 November 2015

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी जमविला 253 कोटीचा प्रचंड निधी

महाराष्ट्र राज्य दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या आणि तिजोरीत खणखणाट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर 253 कोटीचा प्रचंड निधी जमविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने दिली असून यापैकी 76 कोटीचे सहाय करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जमा असलेली आणि बनल्यानंतर जमा झालेल्या निधीची माहिती मागत खर्च आणि शिल्लक रक्कमेची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या जन माहिती अधिकारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 1 नोव्हेंबर 2014 पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात 11 कोटी 68 लाख 43 हजार 475 रुपये शिल्लक होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर आतापर्यंत त्यांनी 253 कोटी 5 लाख 3 हजार 76 रुपये अशी विक्रमी निधी उभी केल्यामुळे पूर्वीच्या रक्कमेत भर होत ती रक्कम 264 कोटी 68 लाख 96 हजार 551 रुपये इतकी झाली आहे. यापैकी आता पर्यंत 76 कोटी 19 लाख 67 हजार 88 रुपयांची सहायता करण्यात आलेली आहे. आता 188 कोटी 49 लाख 29 हजार 463 रुपये शिल्लक आहे. # मुदत ठेव 124 कोटीची मुख्यमंत्री सहायता निधीत कधीही कमतरता पडू नये आणि प्रत्येक गरजुस आर्थिक सहायता करण्यासाठी मुदत ठेव रक्कम ठेवण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी मुदत ठेवीची रक्कम 124 कोटी 50 लाख 32 हजार 346 रुपये होती. आताही तेवढीच रक्कम असून त्यात नवीन कोणतीही भर पडली नसून मुदत ठेव आणि जमा रक्कम अशी एकुण 312 कोटी 99 लाख 61 हजार 809 रुपये रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतुन डांससाठी 8 लाख दिल्याचा गौप्यस्फोट केला होता आणि त्यानंतर 8 लाख त्या डांस ग्रुप ने परत केले होते. अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर जमा केलेली प्रचंड रक्कम कौतुकास्पद आहे. यामुळे असहाय, गरजू आणि निराधार जनतेस मदत होते. सक्षम आणि धनाढ्य लोकांनी अश्या ठिकाणी आर्थिक सहाय करुन मुख्यमंत्री सहायता निधी आणि सरकारचे हात मजबुत करण्याचे काम करावे, असे गलगली यांनी मत व्यक्त करत अपेक्षा व्यक्त केली की मुख्यमंत्री सहायता निधीचे वितरण करताना योग्य दक्षता घ्यावी जेणेकरुन गरजू व्यक्तीनाच आर्थिक सहाय होईल.

No comments:

Post a Comment