Sunday 24 November 2019

सायबर पोलीस ठाण्यास लागले रिक्त पदांचे ग्रहण

सायबर गुन्ह्यांची उकल करण्याचा दृष्टीने महत्वाचा मानला जाणाऱ्या सायबर पोलीस ठाण्यास रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई सारखी पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सायबर पोलीस ठाण्याने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. सायबर पोलीस ठाण्याने पाठविलेली माहिती अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत तरडे यांनी उपलब्ध करुन दिली. या माहितीत एकूण 60 पैकी 47 पदे कार्यरत असून 13 पदे रिक्त असल्याची आकडेवारी दिली आहे. 60 पैकी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई हे पद अति महत्वाचे आहे. पोलीस उपनिरीक्षकांची 17 पदे मंजूर असून यापैकी फक्त 7 कार्यरत आहे. एकूण पोलीस उपनिरीक्षकांची 10 पदे रिक्त आहेत. त्याच्यशिवाय 26 पोलीस शिपाईचे पदे मंजूर असताना 18 पदे ही रिक्त आहेत, फक्त 8 पोलीस शिपाई कार्यरत आहेत. मंजूर पदे नसतानाही पोलीस उपनिरीक्षक ऐवजी 9 सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत व 3 पोलीस हवालदार आणि 7 पोलीस नाईक कार्यरत आहेत. 1 पोलीस निरीक्षक हे पद रिक्त आहेत.

मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असून मंजूर पदे शत प्रतिशत कार्यरत ठेवली तर गुन्ह्यांची उकल होण्यात वाढ होईल आणि गुन्हे करणारे हातही धजावतील, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment