आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्राधिकरणाकडे वरळी ते शिवडी उन्नत मार्गाची माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाने अनिल गलगली यांना कळविले की वरळी ते शिवडी उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.51 किलोमीटर आणि रुंदी 17 मीटर आहे. या प्रकल्पाच्या अपेक्षित खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 147 व्या दिनांक 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केल्याप्रमाणे रु 1276 कोटी इतका आहे. सद्यस्थितीत कंत्राटदार नियुक्तीची व सल्लागार नेमणुकीची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. वरळी ते शिवडी उन्नत मार्गाकरिता ज्या विभागाची एनओसी आवश्यक आहे त्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतुक विभाग आणि मुंबई महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण या विभागाचा समावेश आहे.
अनिल गलगली यांच्या मते हा वरळी ते शिवडी उन्नत मार्ग मुंबई सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अंतर्गत महत्वाचा टप्पा असून एमएमआरडीए प्राधिकरणाने या मार्गासाठी युध्दस्तरावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment