Wednesday, 13 November 2019

स्मशानभूमीत लाकडे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांला पालिकेची नोटीस

मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्मशानभूमीत मयत व्यक्तीला 300 किलो सुकी  लाकडे पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून या पुरवठयात घोळ असल्याची तक्रारी येत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुलुंड टी वॉर्डातील कंत्राटदार के व्ही परुळेकर यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुलुंड पश्चिम डंपिंग ग्राउंड जवळील स्मशानभूमीत ओली आणि कमी दर्जाची लाकडे पुरवठा करत असल्याची तक्रार केली. येथील सहायक आयुक्त के बी गांधी यांनी ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र शिंगाणपूरकर यांनी कारणे दाखवा नोटीस जारी करत स्पष्ट केले आहे की तक्रार पडताळणी नंतर आपणास जबाबदार का धरु नये आणि आपला ठेका का रद्द करु नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे. अनिल गलगली यांच्या मते नागरिकांनी तक्रार करणे आवश्यक असून पालिका प्रशासन आता अजून कठोर कार्यवाही करेल. मुंबईतील सर्व स्मशानभूमीत अशाच सावळागोंधळ सुरु असून त्या- त्या वॉर्डातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी वर्गानी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment