Friday, 15 November 2019

मागील 19 महिन्यात 1081 कोटींचे अमली आणि उत्तेजक पदार्थ मुंबई पोलिसांनी केले हस्तगत

मुंबई पोलिसांच्या हद्दीत अमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थाचा वापर वाढला असून मुंबई पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत मागील 19 महिन्यात 1081 कोटींचे अमली पदार्थ मुंबई पोलिसांनी केले हस्तगत केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यवाहीत 1073 आरोपींना अटक झाली असून यात हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी या अमली आणि उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे.


आरटीआय कार्यकर्ते  अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज करत माहिती विचारली होती की गेल्या एका वर्षात मुंबई पोलिसांच्या हद्दीत अमली आणि उत्तेजक पदार्थ अंतर्गत हस्तगत माल, पदार्थांचे नाव, एकूण किंमत आणि अटक आरोपींची संख्या किती आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद शिंदे यांनी अनिल गलगली यांस वर्ष 2018 आणि चालू वर्षांच्या सप्टेंबर 2019 पर्यंतची माहिती दिली. या माहितीत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हा 1363 किलो 3241 ग्रॅम 1364 मिली ग्रॅम हस्तगत केला. या मालाची किंमत ही 10,16 कोटी 3,2 लाख 56 हजार 45 हजार अशी होती तर एकूण 395 आरोपींना अटक करण्यात आली होती. यात सर्वाधिक आरोपी हे गांजा अमली पदार्थांचे सेवन करत असून त्याची संख्या ही 194 होती. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 64 कोटी 64 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचा 169 किलो 4150  ग्रॅम 1282 मिली ग्रॅम असा माल हस्तगत करण्यात आला. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून एकूण 678 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुंबईत बाहेरील राज्यांतून अमली आणि उत्तेजक पदार्थाचा पुरवठा होत असून पोलिस कार्यवाहीची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे आणि नागरिकांना सहभागी करत अमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती आणि विशेष अभियान चालविण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment