Friday, 29 September 2017

रेल्वेच्या अनियोजनामुळे झाली दुर्घटना

परळ- एलफिस्टन पादचारी पुलावर झालेली दुर्घटना ही रेल्वे प्रशासनाच्या अनियोजनामुळे झाल्याच्या आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला असून वारंवार तक्रारी करुनही रेल्वे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे सामान्य प्रवाश्याना नाहक जीव गमवावा लागला आहे.

मुंबई उपनगरी सेवेकडे दिल्लीश्वरांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी परळ टर्मिनसची केलेली घोषणा आजही कागदावरच आहे. परळ येथील पादचारी पुलावरची गर्दी पाहता मध्य रेल्वेने कल्याण दिशेकडे लाखों रुपये खर्च करुन बांधलेल्या पुलाचा वापर होत नाही कारण रेल्वे अधिका-यांनी अभ्यास न करता स्थान चुकीचे निवडत लाखों रुपये वाया घालविले. बुलेट ट्रेनच्या नादापायी मुंबई उपनगरी सेवेने प्रवास करणाऱ्या 75 लाख प्रवाश्याकडे राज्य आणि केंद्र सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. याप्रकरणी चौकशीचा फार्स न करता ज्या अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे त्यांस घरी पाठविण्याची ईच्छाशक्ती रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अनिल गलगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment