Sunday 24 September 2017

रेल्वेच्या खान पान पदार्थांवर एमआरपी छापने बंधनकारक नाही

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानंतर रेल्वे बोर्डाने रेल्वेत विकल्या जाणा-या खान पान पदार्थांच्या पैकेटवर ज्या बाबी छापण्याचे निर्देश जारी केले होते त्यात आता एमआरपी छापने करणे बंधनकारक नाही. यामुळे एमआरपी पेक्षा जास्त भावाने अन्न पदार्थ विकणा-या विक्रेत्यांची चांदी होणार आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वेच्या या विचित्र आदेशाविरोधात रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि आदेश जारी करणारे संजीव गर्ग यांस पत्र पाठवित झालेली घोडचूक लक्षात आणून दिली आहे. संजीव गर्ग जे रेल्वे बोर्डच्या टुरिझम आणि कॅटरिंगचे अतिरिक्त सदस्य आहेत त्यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानुसार एक निर्देश जारी केला आहे त्यात खान पान पदार्थावर ज्या बाबी छापणे आवश्यक आहे त्यात पुरवठादार किंवा कंत्राटदारांचे नाव, शाकाहारी किंवा मांसाहारी, वजन आणि पॅकिंग दिनांक याचा उल्लेख केला आहे. रेल्वेत एमआरपी पेक्षा जास्त भावाने खान पान पॅकेट विकण्याच्या सर्वाधिक तक्रारी असताना हीच बाब वगळली गेली आहे.

अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल, संजीव गर्ग यांस लेखी पत्र पाठवून मागणी केली आहे की या निर्देशात बदल करत एमआरपी मूल्य छापण्यात यावे जेणेकरून प्रवाश्यांची होणारी लूटमार थांबेल.

No comments:

Post a Comment