Friday, 22 September 2017

33.34 लाख खर्च केल्यानंतरही एमएमआरडीए मुख्यालयात ई-ऑफिसचा अद्यापही नाही

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीए मुख्यालयात ई-ऑफिस अद्यापही सुरु झाली नसल्याची स्पष्ट कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. गेल्या 15 महिन्यापासून ई -ऑफिसचे काम सुरु असून 33.34 लाख रुपये खर्च झाले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे एमएमआरडीए मुख्यालयात ई-ऑफिसची बाबत माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की ई ऑफिससाठी NICISI चा प्रस्ताव आला होता. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान कक्षाने दिनांक 04/07/2016 रोजी काम सुरु केले आहे. काम पूर्ण होण्याबाबतची माहिती विचारली असता काम अजूनही सुरु असल्याची माहिती दिली. आतापर्यंत एमएमआरडीए प्रशासनाने ई-ऑफिससाठी 33.34 लाखांचा खर्चही केला आहे. त्यानंतरही काम अद्यापही पूर्ण झालेच नाही. 

एकीकडे एमएमआरडीए प्रशासन स्मार्ट बीकेसी सारख्या वल्गना करत आहे आणि दुसरीकडे त्याच एमएमआरडीए प्रशासनाचे मुख्यालय स्मार्ट नसल्याची टीका करत अनिल गलगली यांनी लवकरात लवकर ई-ऑफिस सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांसकडे केली आहे. यामुळे नागरिकांचे वेळेत आणि जलद गतीने कार्य करण्यात एमएमआरडीए अधिका-यांस सुलभ होईल आणि एमएमआरडीए मुख्यालय सुद्धा स्मार्ट होईल.

No comments:

Post a Comment