मुंबई महानगरपालिकेने सांताक्रूज पूर्व हंस भुग्रा मार्गावरील पुल एका महिन्यांपूर्वी धोकादायक जाहीर केला होता पण अद्यापही या पुलावरुन वाहतुक सुरुच आहे. खरोखरच सदर पुल धोकादायक असल्यास तो तत्काळ बंद करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. याउलट सद्यस्थितीत अपघात झाल्यास त्यास मुंबई महानगरपालिका आणि वाहतुक पोलीस यांस बरोबरीने जबाबदार ठरवले जाऊ शकते.
मुंबई महानगरपालिकेने एका महिन्यांपूर्वी प्रेस नोट जारी करत 23 नोव्हेंबर पासून सदर पुल बंद करण्याची घोषणा केली होती. हा पुल हंस भुग्रा मार्गास वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाऊन मिळतो. आजपर्यंत पुल बंद करण्यात आला नाही. प्रत्यक्षात अनिल गलगली यांनी गुरुवारी पुलाची पहाणी केल्यानंतर हा पुल अत्याधिक धोकादायक असल्याची बाब समोर तर आली आणि ठिकठिकाणी भेगा सुद्धा दिसत होत्या. मुंबई महानगरपालिका आणि वाहतुक पोलीस यांस संयुक्त कार्यवाही करत हा पुल बंद करण्याची आवश्यकता आहे.
अनिल गलगली यांनी संपूर्ण प्रकरणाची तक्रार महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांस पत्र लिहित करत कार्यवाहीची मागणी केली आहे.जर मुंबई महानगरपालिकेने खोटा अहवाल दिला असल्यास संबंधित अधिकारी वर्गावर कार्यवाहीची मागणी केली आहे आणि पुलाचा धोकादायक अहवाल खरा असल्यास वाहतुक पोलिसांवर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment