जागतिक बेघर दिवस मुंबईतील कमाठीपुरा येथे साजरा करण्यात आला. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती देत म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बेघरांचे 'अच्छे दिन' येतील.
मुंबईतील कमाठीपुरा येथे पहचान संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य जे महाराष्ट्र राज्य निवारा समितीचे सदस्य आहेत, यांच्या पुढाकाराने जागतिक बेघर दिवस साजरा करण्यात आला. अनिल गलगली जे बेघरांसाठी काम करतात, ते म्हणाले की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत 125 निवारे बांधण्यासाठी काम सुरु केले असून राज्यातील महानगरपालिका आता बेघरांसाठी सकारात्मक झाली आहेत कारण दस्तुरखुद्द मुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत. पहचान संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य म्हणाले की निवारा समितीच्या निर्णयाचा आता दिल्ली, आंध्रप्रदेश, तमिळनाडू हे अनुकरण करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे आणि निवारा समिती हे प्रत्येकाला घर देण्यासाठी कटिबध्द आहे. यावेळी लीना पाटील,सुहास रोकडे, शीला पवार, अंजली सातेलिया, नसीम शेख, सलमा बी,विजय गजबिनकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment