Wednesday, 9 October 2019

विश्व सेरेब्रल पाल्सी दिवस साजरा करण्यात आला

सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया, सांताक्रुझ(पू) या संस्थेमार्फेत विश्व सेरीब्रल पाल्सी दिवसाचे औचित्य साधत मनराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ.शैलेन्द्र सिंह (ज्येष्ठ रेडीओलाॅजीस्ट), आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, डाॅ.इशा गुप्ता(एम.डी.बालरोग तज्ञ) हे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शिबीराचे दिप प्रज्वलन करून करण्यात आले. संस्थेच्या वतीने मतिमंद व बहुविकलांगाच्या स्पर्धा घेण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देऊन प्रोत्साहित केले. 

संस्थेच्या हेड मंजूषा सिंह यांनी संस्थेची माहिती दिली. रुग्ण मित्र व समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विनोद साडविलकर, जितेंद्र तांडेल,जयराम नाईक,जय,साटेलकर,योगेश माने,धनंजय पवार, गणेश पवार, स्नेहा पवार, मंदेश पवार, सुजाता सावंत, स्वाती पाटील, श्रुती गमरे, डाॅ.श्रुती हळदणकर, डाॅ.वासंती करीधावन, संदिप हिरे, विश्वनाथ सावंत, श्याम भगत, राॅड्रीग्स(एक्वा फाउंडेशन), राघव चौधरी, सिंथीया मॅथ्यूस, नम्रता मेहता, भावेश मेहता, अनिल देव, दिपक मेहता, गीता मेहता, गीता ठक्कर, चारूदत पावसकर, शिक्षिका संजना मसूरकर, भोपाल सीपीए संस्थेचे जसवंत राणा इ.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलांनी व पालकांनी सहभाग घेतल्याने ११५ लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला, संस्थेच्या वतीने समाजसेवक मनोज नाथानी व विनोद साडविलकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. राजू गोल्लार, शशीकांत फडके सीपीएचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व दुःख विसरून विश्व सेरेब्रल पाल्सी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment