सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रति 1 लाख संख्येप्रमाणे 1 निवारा असे रात्रकालीन 125 निवारे उपलब्ध करुन देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविली आहे. सद्या 20 ठिकाणी निवारे सुरु असून अन्य 125 ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून रात्रकालीन निवारा बाबतीत निवेदन दिले होते. अनिल गलगली यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत एका लाखांमागे एक असे मुंबईत रात्रकालीन 125 निवारे उभारण्याची मागणी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी अनिल गलगली यांना कळविले की सद्या 20 निवारे सुरु आहेत. बांधकाम सुरु असलेले 4 आणि लवकरात सुरु होणारे 4 असे 8 निवारे आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय विभागाकडून 44 समाजकल्याण असलेल्या ठिकाणी निवारे सूचित करण्याकरिता यादी सूचित केली आहेत. 4 ठिकाणी सशुल्क स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर शहरी बेघरांसाठी निवा-यांचे बांधकाम करणे तर 4 ठिकाणी सुरु करण्यासाठी पालिका काम करत आहे. तसेच 66 ठिकाणी विकास नियोजन आराखड्यात 2034 मध्ये आरक्षित भूखंडावर शहरी बेघरांसाठी इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. ज्या समाजकल्याण केंद्रात निवारा सूचित करण्यात आला आहे त्यात 7 ए वॉर्ड, 5 सी वॉर्ड, 3 एफ उत्तर, 2 टी वॉर्ड, 1 ई वॉर्ड, 1 जी दक्षिण, 3 एच पूर्व, 1 एल वॉर्ड, 6 एम पूर्व वॉर्ड, 1 एन वॉर्ड, 1 पी दक्षिण, 1 आर मध्य, 2 आर उत्तर, 2 आर दक्षिण, 2 एस वॉर्ड, 1 टी वॉर्ड, 4 के पश्चिम आणि 1 जी दक्षिण याचा समावेश आहे. तर परळ आणि शिवडी येथे 4 ठिकाणी स्वच्छता संकुल तयार अवस्थेत मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत. तसेच जेजे, हिंदुजा, चेंबूर, शिवाजी नगर आणि परळ येथे 6 ठिकाणी तात्पुरते शेडचे बांधकाम सुरु आहेत.
अनिल गलगली यांच्या मते रात्रकालीन निवारे सुरु झाल्यानंतर त्याचे परिरक्षण आणि आवश्यक सुविधा देण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर यंत्रणा उभी करावी जेणेकरुन हे रात्रकालीन निवारे बेघरांसाठी जास्तीत जास्त उपयोगी ठरतील.
No comments:
Post a Comment