Tuesday 2 April 2019

लाखमोलाचा स्वच्छ भारत अभियान शौचालय एका वर्षांपासून बंद, पंतप्रधान कार्यालयास पालिकेने उल्लू बनविले

स्वच्छ भारत अभियान या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत मुंबईतील ई विभागातील प्रभाग क्रमांक 209 येथे लाखों रुपये खर्च करत बनून तयार करण्यात आलेला शौचालय गेल्या एका वर्षांपासून बंद आहे. याबाबतीत पंतप्रधान कार्यालयात पालिकेने उल्लू बनवित खोटी माहिती दिली असल्याची बाब उघडकीस आली आहे. आरटीआय  कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लेखी तक्रार करत शौचालय तत्काळ सुरु करत खोटी माहिती देणारे  पालिकेचे अधिकारी चंदन डोंगरे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.


स्वच्छ भारत अभियान या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत मुंबईतील ई विभागात प्रभाग क्रमांक 209 बनवून तयार झालेला शौचालय एका वर्षांपासून बंद असल्याची तक्रार अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली. याबाबतीत चौकशी सुरु होताच पालिकेने शौचालय जनतेसाठी सुरु करण्याऐवजी पालिकेचे सहाय्यक अभियंता चंदन डोंगरे यांनी खोटी माहिती देत पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रार महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी बिपिन मलिक, मेधा गाडगीळ, मनीषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यामार्फत ई वार्ड घनकचरा विभाग स्तरावर सहाय्यक अभियंता चंदन डोंगरे यांसकडे कार्यवाहीसाठी पाठविला. चंदन डोंगरे यांनी पंतप्रधान कार्यालयास चक्क खोटी माहिती देत अभिप्राय दिले की शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. सीबीओ प्रक्रियेत आहे आणि सीबीओ स्थापन होताच शौचालय नागरिकांसाठी सुरु करण्यात येईल.प्रत्यक्षात ठीक एका वर्षांपूर्वी म्हणजे 12 जानेवारी 2018 रोजी सहाय्यक आयुक्त असलेल्या साहेबराव गायकवाड यांनी या शौचालयाचे विधिवत उदघाटन केले होते तरीही श्री डोंगरे यांनी खोटी माहिती देते पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केली आहे. 

अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका आयुक्त अजय मेहता, पालिका उपायुक्त अशोक खैरे, हर्षद काळे यांसकडे लेखी तक्रार करत शौचालय तत्काळ सुरु करत खोटी माहिती देणाऱ्या चंदन डोंगरे या अधिका-यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. सीबीओ बनविल्यानंतरच कामाचे कार्यादेश जारी होत असून राजकीय हस्तक्षेपामुळे पालिका अधिकारी नगरसेवकांच्या तोंडी परवानगी नसल्यास कार्यवाही करत नसून यामुळे स्वच्छ भारत अभियानाला अप्रत्यक्ष खीळ घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment