Tuesday 30 April 2019

मध्य रेल्वे 280 एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत

मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये 3.37 कोटी खर्च केले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मध्य रेल्वे मुंबई विभागात अस्तित्वात असलेल्या एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटची माहिती मागितली होती. मध्य रेल्वेच्या पूल विभागाने अनिल गलगली यांस कळविले की एफओबी आणि आरओबीची सामान्य सुरक्षा ऑडिट बाह्य एजन्सीला दिली जात नाही. विविध अभियंताच्या निश्चित केलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असते तसेच मोठ्या सुचनेवर काम होते. ऑगस्ट 2018 ते मार्च 2019 या कालावधीत 191 एफओबी आणि 89 आरओबीचे सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे केले गेले असून सुरक्षा अहवाल लाच्या प्रतिक्षेत आहे. एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर 3 कोटी 37 लाख 800 रुपये शुल्क निश्चित केले असून 50 टक्के म्हणजे 1 कोटी 68 लाख 50 हजार 400 रुपये ऍडव्हान्स देण्यात आले आहे. अद्यापही सुरक्षा अहवाल त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाला नाही. 

अनिल गलगली यांच्या मते एफओबी आणि आरओबीची संख्या 280 असून आयआयटी मुंबईने टप्याटप्याने सुरक्षा अहवाल देणे अत्यावश्यक आहे तसेच सामान्य प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून आवश्यक सुरक्षा ऑडिटवर पैसे खर्च तर होतात पण सुरक्षा अहवाल वेळेत प्राप्त होत नाही. सुरक्षा अहवाल हे ऑनलाइन करत सार्वजनिक करण्याची मागणी अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.


No comments:

Post a Comment