मुंबईतील आझाद मैदानाच्या पुढे जाण्याची परवानगी आंदोलन करणा-यांना नसते. संपूर्ण वर्षात आझाद मैदानात राजकीय पक्ष,सामाजिक संघटन, विद्यार्थी संघटन, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाज बरोबर व्यापारी संघटन आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि आंदोलन करतात. वर्ष 2018 या संपूर्ण वर्षात एकूण 638 आंदोलनात 2.58 लाख लोकांनी भाग घेतल्याची आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. आझाद मैदानात दरदिवशी सरासरी 2 आंदोलन होतात आणि 704 आंदोलक उपस्थित असतात.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे माहिती मागितली होती की वर्ष 2018 या वर्षात आझाद मैदानात झालेल्या विविध प्रकाराचे आंदोलन आणि त्यात भाग घेतलेल्या लोकांची संख्या किती होती. आझाद मैदान पोलिसांनी अनिल गलगली वर्ष 2018 या वर्षी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाची संख्यात्मक आकडेवारी उपलब्ध केले आहे. वर्ष 2018 या एकूण 12 महिन्यात 638 आंदोलनाचा साक्षीदार आझाद मैदान होता. यात 2 लाख 57 हजार 220 लोकांनी भाग घेतला. सर्वाधिक आंदोलन सामाजिक संघटना तर्फे करण्यात आली आहेत. एकूण 301 आंदोलन पोलिसांच्या अभिलेखावर नोंदणीकृत आहेत ज्यात 40 हजार 101 लोकांनी भाग घेतला. सर्वाधिक गर्दी ही अन्य संघटन आणि व्यापारी संघटनाची होती. एकूण 167 आंदोलनात 87 हजार 746 लोक सहभागी झाले होते. कामगार संघटनातर्फे आयोजित 68 आंदोलनात 39 हजार 532 लोकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनाच्या 9 आंदोलनात 1392 लोक उपस्थित होते. मुस्लिम संघटनेतर्फे 9 वेळा केलेल्या आंदोलनात 26 हजार 151 लोक सहभागी झाले होते. ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजातर्फे 44 आंदोलनात 36 हजार 552 लोक एकत्रित आले होते.
भाजपा, राष्ट्रवादी, कांग्रेस, बसपा आणि आरपीआय या राजकीय पक्षाने फक्त 29 आंदोलन आझाद मैदानावर करण्यात आले होते यात एकंदरीत 25 हजार 746 लोकांनी भाग घेतला होता. भाजपाने फक्त 5 वेळाच आंदोलन केले होते पण 18 हजार 330 इतकी गर्दी जमा केली होती. आरपीआय तर्फे सर्वाधिक 18 आंदोलन करण्यात आले होते ज्यात 99 लोकांनी भाग घेतला होता. कांग्रेसच्या 12 आंदोलनात 1642 लोक उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी पक्षाने फक्त एकदाच आंदोलन केले होते ज्यात 3500 लोक उपस्थित होते. बसपाने केलेल्या 3 आंदोलनात 1275 लोक आझाद मैदानात जमा झाले होते. शिवसेना पक्षाने एकदाही कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली यांची मागणी केली आहे की आझाद मैदान पर्यंत आंदोलनकारी जाऊ शकतात. अश्या स्थितीत मुंबई पोलिसांना आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांच्या शिष्टमंडळास कोणत्या मंत्र्यांस अथवा सरकारी अधिका-यांस निवेदन देण्यासाठी सुरक्षेत मंत्रालय, विधानसभा किंवा मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर घेऊन जाणे आणि पुन्हा आझाद मैदानावर सुरक्षित पोहचविण्याची जबाबदारी असते. यात वेळ आणि इंधनाचे नुकसान होते. यासाठी आझाद मैदानावर बनविलेल्या ब्यारेक्स येथे संबंधित मंत्री अथवा सरकारी अधिकारी उपस्थित राहत आझाद मैदानावरच भेट घेत निवेदन स्वीकारले तर सामान्य नागरिक आणि शासनामधील संबंध वाढतील आणि समन्वय वाढेल. तसेच वेळेची बचत होईल.
No comments:
Post a Comment