वसई पूर्व येथील शिरवली गावांत केंद्र आणि राज्य शासनातर्फे संचालित योजनेची माहिती देत त्यासाठी महिलांना 2 दिवसीय महिला प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना वसई- विरार महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव म्हणाले की महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून महिलांनी पुढाकार घ्यावा.
पंचशील युवक मंडळ आणि श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे आयोजित शिबिरांचे उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. अनिल गलगली यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती देत आवाहन केले की प्रत्येक महिलांनी योजना आणि त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण अधिकारी हसमुख जारीया म्हणाले की शासन नेहमीच महिलांना विविध माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे. प्रोफेसर अफरोज शेख यांनी दैनंदिन जीवनातील महत्वाच्या टिप्स दिल्यात. आयमन कांचवाला यांनी सांगितले की महिलांनी स्वतःची ताकद ओळखण्याची गरज आहे.
यावेळी स्थायी समिती सदस्य वैभव पाटील, उप आरोग्य सभापती भुपेंद्र पाटील, ग्राम पंचायत सदस्य वैशाली उबाळे, ग्राम सेवक श्रीकांत मोरे, सुभाष गायकवाड, किरण बढे, नितीन गायकवाड, शंकर उथळे, भूषण मोने, दिनेश मधुकुंटा, उपेंद्र सोनटक्के, अरुण भोईर, राजेंद्र उबाळे, किरण जाधव, प्रणाली मुकणे, हेमंत गायकवाड, पंकज जाधव, मिलिंद उबाळे, रमेश उबाळे, उदय जाधव, रघुनाथ जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रकाश उबाळे यांनी केले.
No comments:
Post a Comment