Monday, 20 July 2015

मुकेश अंबानी एमएमआरडीएचे थकबाकीदार

देशातच नव्हे तर जगातील धनाढय उद्योगपति असलेले रिलायंस इंडस्ट्रीजच सर्वेसर्वा मुकेश अंबानी एमएमआरडीएचे थकबाकीदार असून 34 महिन्यापासून अतिरिक्त प्रीमियम न भरल्यामुळे मे.रिलायंस इंडस्ट्रीज प्रा.लि. कडून 341 कोटी रक्कम येणे बाकी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे बीकेसी मधील 'जी' ब्लॉक मधील सी-66 येथील जमिनीबाबत माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की 'जी' ब्लॉक मधील सी-66 या जमीनीचे लीजधारक मे.रिलायंस इंडस्ट्रीज प्रा.लि. असून त्यास दिनांक 27/ 09/ 2008 रोजी वितरण करण्यात आले आहे. जमीनीची एकूण रक्कम 918 कोटी 3 लाख 5 हजार 550 रुपये आहे. 10183.18 चौरस मीटर पैकी बांधकामासाठी 20366 चौरस मीटर पब्लिक कार पार्किंग आणि 30550 चौरस मीटर कमर्शियल काम्प्लेक्स साठी वापरण्याची अट घातली गेली तसेच अधिकतम 550 कार पार्किंग बंधनकारक केले. वार्षिक भाडे रु 1 म्हणजे 10,183 हे प्रति चौरस मीटर आकारले जात असून प्रत्येक वर्षी यात 10 टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली आहे. लीज डीड पासून काम सुरु करुन पूर्ण करण्याची मुदत 4 वर्ष असताना मे.रिलायंस इंडस्ट्रीज प्रा.लि त्या अटीचे उल्लंघन केले. एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी 40 टक्के अतिरिक्त प्रीमियम आकारत दिनांक 28/05/2015 पर्यन्त मुदतवाढ दिली. या मुदतवाढीची रक्कम रुपये 341 कोटी ( अंदाजे) एवढी अजुन ती मे.रिलायंस इंडस्ट्रीज प्रा.लि या भाडेपट्टेदराकडून येणे बाकी आहे. मे.रिलायंस इंडस्ट्रीज प्रा.लि या मुकेश अंबानी यांच्या कंपनीने मुदतवाढ तर घेतली पण कोटयावधी रुपये अदा करण्याचे टाळले आहे, ही वस्तुस्थिति पहाता एमएमआरडीए प्रशासनाने ताबडतोब काम थांबविणे आवश्यक असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी अतिरिक्त प्रीमियम न भरणा-या कंपनीकडून व्याजासहित रक्कम वसूल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांस पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment