Sunday, 5 July 2015
असल्फा ते श्रेयस जंक्शन पार करा फक्त 5 मिनटात
अंधेरी घाटकोपर जोडरस्त्यावरील एक महत्वाचा टप्पा एमएमआरडीए प्रशासनाने पूर्ण केला असून यामुळे असल्फा ते श्रेयस जंक्शन हे 5 मिनटात पार होत आहे. या मार्गामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे या मार्गातील वाहतूक गतिमान होण्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी इतक्याच अंतरासाठी 30 ते 40 मिनटे वाया जात होती.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे असल्फा ते श्रेयस जंक्शन पर्यन्त जोडरस्त्याची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाचे कार्यकारी अभियंता प्र. जि. भांगरे यांनी अनिल गलगली यांस कळविले की 2.90 किलोमीटर इतकी लांबी असलेला अंधेरी घाटकोपर जोडरस्त्याचे 9 टप्प्यात काम झाले असून आरबी कदम मार्गावरील दक्षिण वाहिन्यातील स्टील सुपर स्ट्रक्चर मधील व्हायाडक्टचे काम आणि जागृती नगर जवळील उर्वरित स्टील व्हायाडक्टचे काम डिसेंबर 2015 अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सर्व कामाची निविदा रक्कम 77.46 कोटी रुपये होती जी आता सुधारित झाल्यामुळे 88.43 कोटी रुपये झाली आहे. यामध्ये 10.97 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एमएमआरडीए प्रशासनाने जसे आहे तसे या तत्वावर सदर रस्ता पालिकेस हस्तांतरित केला असून स्थानिक नागरिकांकडून वापरण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. या अंधेरी घाटकोपर जोडरस्त्यामुळे एलबीएस आणि नरसी मेहता मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी झाला असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी सांगितले की काही काम शिल्लक असून आता सर्वोदय हॉस्पिटल मार्गे घाटकोपर स्टेशन दिशेने जाण्यास शॉर्टकट पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे मेट्रोच्या खालच्या भागातील हा रस्ता घाटकोपर आणि जागृती नगर या मेट्रो स्थानकाला एकमेकांशी जोडत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment