महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या कोविड टास्क फोर्स समितीत प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागातील ( सामुदायिक औषध विभाग ) तज्ञांचा समावेश केलाच नसल्याची बाब समोर आली असून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सरकारकडे याबाबतीत लक्ष वेधले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव अजोय मेहता आणि प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की महाराष्ट्र शासनाने मृत्यू दरात होणारी वाढ लक्षात घेत नियंत्रण करण्यासाठी एका कोविड टास्क फोर्सचे गठन केले. यात खाजगी रुग्णालयातील खाजगी डॉक्टर मंडळींचा समावेश आहे. दुर्दैवाने यात टास्क फोर्समध्ये प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागातील ( सामुदायिक औषध विभाग ) तज्ञांचा समावेश केला नाही जे सर्वात महत्वाचे घटक आहेत.
अनिल गलगली पुढे म्हणाले की आज कोविड टास्क फोर्स काय करते आणि नियोजनाची माहिती कोणासही नाही. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला असून यासाठी शासनाला प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागातील ( सामुदायिक औषध विभाग ) तज्ञांचा गरज लागेल. त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ शासनाला होऊ शकतो, असे गलगली यांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment