Monday, 22 June 2020

कोरोना लॉकडाउन 4 मधील मार्गदर्शक तत्वात सामील कंटेनमेंट क्षेत्रातील पॉझिटिव्ह प्रकरणे शोध करण्यात मुंबई पालिकेचे दुर्लक्ष

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0  च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, केंद्र सरकारने कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शोधून काढण्यावर भर देत घरों-घरी पाळत ठेवण्याची तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सर्व उपाययोजना करण्याची शिफारस लागू करण्याबाबत सूचना जारी केल्या होत्या पण या सूचना 17 मे 2020 रोजी जारी झाले असूनही आजमितीला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कोणतीही कार्यवाही न करण्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांसकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0  च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, केंद्र सरकारने कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शोधून काढण्यावर भर दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे ओळखण्याच्या उद्देशाने आणि अशा प्रकारचे प्रकरण स्वतंत्रपणे आणि प्रभावीपणे प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकरणांना अलगद वागणूक देण्याच्या उद्देशाने ही बाब लॉकडाऊन 4.0 च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या पत्रव्यवहारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना मान्य केले आणि कंटमेंट झोनमध्ये उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

आज मुंबईत रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढत असून मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप अनिल गलगली यांनी करत कंटेनमेंट झोनमध्ये कोठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही आणि कोरोना पॉझिटिव्ह प्रकरण जिथे सापडली जातात तेथेही दुर्लक्ष होत आहे. कंटमेंट झोन म्हणजे संपूर्ण बंद,असा अर्थ काढला जात असून याठिकाणी या कंटमेंट झोनमध्ये अचूक आणि सतत प्रकरणे शोधून काढल्यास कोरोनाचा अधिक फैलाव होण्यापासून मुंबईला वाचवू शकतो,असे गलगली यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment