Monday 30 September 2019

2007 पासून पोलिसांची वेतन खाती आहेत अॅक्सिस बँकेत- महाराष्ट्र पोलीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने पोलिसांची वेतन खाती अॅक्सिस बँक  बँकेत सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत आला आहे. पण वर्ष 2005 च्या शासन निर्णयांनंतर फक्त अॅक्सिस बँकेत नव्हे तर चक्क 14 राष्ट्रीय आणि खाजगी बॅंकेत पोलिसांना खाते उघडण्याची परवानगी वित्त विभागाने दिली असून 2007 पासून पोलिसांची खाती आहेत अॅक्सिस बँक  बँकेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे दिनांक 30 ऑगस्ट 2019 रोजी अर्ज करत पोलिसांच्या वेतन ज्या बँकेत उघडण्यासाठी परवानगी दिली आहे त्याची विविध माहिती मागितली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक अनिल सावंत यांनी अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय 29 ऑगस्ट 2005 नुसार संपूर्ण राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मासिक देय वेतन व भत्यांचे प्रदान, बँकेमार्फत करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात केली आहे. त्यापैकी एकूण 14 राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बॅंकाशी शासनाने करार केला असून सदर शासन निर्णयानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पसंतीनुसार 14 बँकांपैकी कोणत्याही बँकेच्या शाखेत आहरण व  संवितान अधिका-यांचे वेतन खाते उघडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सदर 14 बँकेमध्ये अॅक्सिस बँकेचा  तेव्हाची युटीआय बँकेचा समावेश आहे.याच शासन निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वेतन अदा करण्यासाठी यांचे वेतन खाते हे वर्ष 2007 पासून अॅक्सिस बँकेत उघडण्यात आले आहे. ज्या बँका चांगल्या सुविधा देतात त्यात वेतन खाते उघडण्यासाठी पोलीस दलातील संबंधित घटक प्रमुख आपल्या स्तरावर निर्णय घेतात. अनिल गलगली यांनी हे ही विचारले होते की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वृंदाची वेतन खाती अॅक्सिस बँकेत आहेत. त्याविरोधात तक्रारी किंवा सूचना आल्या असल्यास त्याची माहिती विचारली असता श्री सावंत यांनी कळविले की या कार्यालयास तक्रारी किंवा सूचना प्राप्त झाल्याचे अभिलेखावरून दिसत नाही.

या 14 बँकेत भारतीय स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नेशनल बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, युनियाटेड बँक ऑफ इंडिया, यूटीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक लिमिटेड हया प्रमुख आहेत. सद्याची अॅक्सिस बँक ही पूर्वीची यूटीआय बँक लिमिटेड होती. अनिल गलगली यांच्या मते जेव्हा शासनाने 2005 मध्ये पोलिसांना 14 बँकेचा पर्याय दिला होता आणि कोणत्याही पोलिसांनी याबाबत तक्रार असो किंवा सूचना केल्या नाहीत, ही बाब महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्ट केली आहे.

No comments:

Post a Comment