Friday 20 September 2019

महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी स्थापलेलं महाराष्ट्र अध्ययन केंद्र 9 वर्षांपासून सुरु होण्याच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने स्थापलेलं महाराष्ट्र अध्ययन केंद्र गेल्या 9 वर्षांपासून प्रस्तावित असून प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाते. विशेष म्हणजे आजमितीस सुरु न झालेल्या महाराष्ट्र अध्ययन केंद्रावर लाखों रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे 31 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र अध्ययन केंद्र बाबत विविध माहिती मागितली होती. तब्बल 6 महिन्यानंतर अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या माहितीत मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र अध्ययन केंद्र अद्यापही सुरु न झाल्याचे कळविले. अनिल गलगली यांस 6 महिन्यानंतर जी कागदपत्रे दिली आहेत त्यात स्पष्ट केले आहे की 8 फेब्रुवारी 2016 रोजी डॉ भारती निरगुडकर यांनी भारत कुमार राऊत, अध्यक्ष, महाराष्ट्र अध्ययन केंद्र यांस विद्यानगरी येथे निमंत्रित केले होते. महाराष्ट्र अध्ययन केंद्राचे स्वरुप महाराष्ट्राचा अभ्यास करवून घेण्यासाठी, अभ्यास केंद्र म्हणून राहील. विद्यापीठ प्रेस, ग्रंथमेळा, नाटक/ एकांकिका स्पर्धाचे डॉक्युमेन्टेशन, मुंबईचा इतिहास आणि माहितीपट अश्या 5 उपक्रमावर लक्ष केंद्रित करत त्यानंतर 5 वर्षांनंतर महाराष्ट्राचा अभ्यास केला जाईल. 

मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र अध्ययन केंद्र सुरु केले नाही पण प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अर्थसंकल्प 2010-2011 या आर्थिक वर्षात 5 लाखांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2011-2012 या आर्थिक वर्षात 5 लाखांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2012-2013 या आर्थिक वर्षात 29,95,750 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2013-2014 या आर्थिक वर्षात 5 लाखांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2014-2015 या आर्थिक वर्षात 5 लाखांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2015-2016 या आर्थिक वर्षात 90 हजारांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2016-2017 या आर्थिक वर्षात 18,46,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2017-2018 या आर्थिक वर्षात 90 हजारांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2018-2019 या आर्थिक वर्षात 90 हजारांची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्प 2019-2020 या आर्थिक वर्षात 90 हजारांची तरतूद करण्यात आली होती. 

अनिल गलगली यांनी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की प्रस्तावित महाराष्ट्र अध्ययन केंद्र ताबडतोब सुरु करत उद्देश्यांची पूर्ती करण्यात यावी.

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ अनिल सपकाळ यांनी अनिल गलगली यांना कळविले आहे की मराठी विभाग प्रमुख हा महाराष्ट्र अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी नियुक्त केलेल्या समितीचा एक पदसिध्द सदस्य आहे. केंद्रांच्या बैठकांना मराठी विभाग प्रमुख उपस्थित राहत असतो परंतु प्रस्तुत केंद्र अद्याप प्रस्तावित असल्यामुळे तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. तसेच अध्ययन केंद्रांची निर्मिती झालेली नसल्याने नेमक्या कामकाजाची माहिती देता येत नाही.

No comments:

Post a Comment