रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील न होणाऱ्या चर्चात्मक बाबीमुळे नेहमीच वाद निर्माण होतो. यात वेळीच सुधारणा न झाल्यामुळे वाद विकोपाला जातो.याच पाश्वभूमीवर इंस्टिट्यूट फॉर पैरामेडिकल एजुकेशन एंड रिसर्चचे संस्थापक सुमित काटी यांच्या तर्फे एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा रुग्णालयात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या कार्यशाळेत व्यवहारिक बाबींवर प्रकाश टाकण्यात आले.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रतिपादन केले की देशातील हे प्रथम असे रुग्णालय आहे ज्यांनी रुग्णांची काळजी प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात वयाचे अनुकरण देशातील अन्य रुग्णालय नक्कीच करतील, असा विश्वास गलगली यांनी व्यक्त केला. सुमित काटी यांनी आपल्या कार्यशाळेत रुग्णांना बोलते कर यांसकडून त्यांच्या भावना समझण्यावर भर दिला. कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रसित मानसिकेतून रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यावर जोर दिला.
रुग्णालयाचे ट्रस्टी अध्यक्ष मगनभाई दोशी यांचे मार्गदर्शन आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव देवगिरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत ट्रस्टी हितेश खोखानी, कौशिक पारेख, समिती सदस्य महेंद्र मेघानी, जस्मीन कोठारी सहित (एएमओ ) डॉ. रजनीकांत मिश्र, डॉ. रविंद्र कांबळे सोबत एएमओ, आरएमओ आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राहुल कोल्हे यांनी केले.
No comments:
Post a Comment