Saturday, 18 May 2019

7 वर्षात शेकडो क्रिकेट सामन्याचे पोलीस बंदोबस्ताचे 21.34 कोटी रुपये मुंबई पोलीस केव्हा वसूल करणार? 

मुंबई पोलीस दलातील हजारों पोलीस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जात असून त्या बंदोबस्ताचे शुल्क अदा करण्यात मुंबई क्रिकेट एसोसिएशन चालढकल करत आहे. मागील 7 वर्षात क्रिकेट स्पर्धेकरिता पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे रु 21.34 कोटी आजपर्यंत अदा केले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलीसांनी दिली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच संपन्न झालेल्या क्रिकेट सामनाच्या बंदोबस्तासाठी गृह विभागाचे आदेश प्राप्त न झाल्याचा दावा करत बंदोबस्त तर पुरविला परंतु आजमितीला कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीसांकडे 1 जानेवारी 2011 पासून संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलीस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (समन्वय) दिलीप थोरात यांनी बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती उपलब्ध करत कळविले की महिला वर्ल्ड कप 2013 चे सामने 26 जानेवारी 2013 ते 18 फेब्रुवारी 2013 या कालावधीत झालेत त्याचे शुल्क रु 6,66,22,088 होते जे व्याजासह रु 10,55,32,197 इतके झाले आहेत जे आजपर्यंत अदा केले नाहीत. 25, 30 आणि 31 ऑक्टोबर 2015 रोजी झालेल्या एक दिवसीय सामन्याचे शुल्क रु 83,52,089 इतके होते जे व्याजासह रु 1,12,26,164 इतके प्रलंबित आहे. 8 डिसेंबर 2016 ते 12 डिसेंबर 2016 या दरम्यान झालेल्या क्रिकेटच्या कसोटी सामन्याचे 50 लाखाचे शुल्क आता व्याजसह रु 55,18,344 इतके बाकी आहे. 22 ऑक्टोबर 2017 च्या एक दिवसीय सामन्याचे 66 लाखाचे शुल्क व्याज जोडल्यानंतर रु 73,98,641 आणि 24 डिसेंबर 2017 च्या टी-20 सामन्याचे शुल्क 66 लाख हे व्याज जोडल्यानंतर रु 72,79,250 इतके झाले आहे. आयपीएल 2017 मध्ये 9, 12, 16, 22 आणू 24 एप्रिल 2017 आणि 11 तसेच 16 मे 2017 मध्ये एकूण शुल्क रु 4,62,00,000 पैकी रु 66,00,000 इतके शुल्क अजून देणे प्रलंबित आहेत जी व्याजसह रु 76,84,710 इतके देणे बाकी आहे. वर्ल्ड टी-20 2016 मध्ये 10, 12, 16, 18,20 आणि 31 मार्च 2016 या सामन्याचे रु 3,60,00,000 शुल्क होते जे व्याजासह रु 4,62,40,399 इतके अजून शेष आहे.आयपीएल 2018 मध्ये 7,14,17,24 एप्रिल तसेच 6, 13, 16, 22 आणि 27 मे 2018 चे एकूण शुल्क रु 4,90,00,000 पैकी रु 1,40,00,000 इतके बाकी असून व्याजासह रु 1,48,86,667 इतकी रक्कम शेष आहे. 29 ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या एक दिवसीय सामन्याचे रु 75, 00,000 शुल्क हे व्याजसह रु 76,78,125 इतकी रक्कम अदा नाही केले आहे. 


शुल्काबाबत गृह विभाग मौन!

आयपीएल 2019 मध्ये 24 मार्च, 3, 10, 13 आणि 15 एप्रिल तसेच 2 आणि 5 मे 2019 जे सामने झाले होते त्या सामन्याचे बंदोबस्त शुल्काबाबत मुंबई पोलीस सद्या द्विधा मनस्थितीत आहे. मुंबई पोलिसांनी अजीब दावा केला आहे की क्रिकेट बंदोबस्त शुल्काबाबत शासन आदेश क्रमांक 31/03/2019 पर्यंत असून माहे एप्रिल 2019 पासून बंदोबस्त शुल्काचे आदेश गृहविभाग, मंत्रालय यांसकडून आदेश निर्गमित झाल्यानंतर आयोजकास बंदोबस्त शुल्क पोलीस उप आयुक्त, सशस्त्र पोलीस या कार्यालयास भरणा करण्याबाबत कळविण्यास येईल. मुंबई पोलिसांनी अजब दावा केला आहे की गृह विभागाचे आदेश 31 मार्च 2019 पर्यंत असून नवीन आदेश प्राप्त न झाल्यामुळे सद्या झालेल्या सामन्याचे शुल्क आकारलेले नाही. शासन निर्णय आल्यानंतर संबंधितांना शुल्क कळविण्यात येईल.


अनिल गलगली यांच्या मते पोलीस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणा-या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब अदा करणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल केले नसून पोलीस आयुक्तांनी जबाबदार अधिकारीवर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करत अश्या सामन्यांचे शुल्क सामना संपताच वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आधीच शुल्क वसूल करावे. जेणेकरुन पोलीसांस बंदोबस्ताचे शुल्क वसूलीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

No comments:

Post a Comment